Hanif Abbasi : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terrorist attack) भारताने सिंधू पाणी करार (Indus Water Treaty रद्द केला. यामुळं पाकिस्तान चांगलाच संतापलाय. पाकिस्तानी नेते भारताला धमकी देणारी आणि चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी(Hanif Abbasi) यांनीही भारताला अणुहल्ल्याची उघड धमकी दिली आहे. पाकिस्तानचे अण्वस्त्रे आणि घौरी, शाहीन आणि गझनवी सारखी क्षेपणास्त्रे भारताविरुद्ध तयार ठेवण्यात आलीयेत, असा अब्बासी यांनी उघडपणे इशारा दिलाय.
‘काश्मीर आमचे आहे, आम्ही मोठ्या संख्येने येणार’ … अभिनेता अतुल कुलकर्णी पोहोचला पहलगाममध्ये
अब्बासी म्हणाले, जर भारताने पाणीपुरवठा थांबवला तर त्यांनी पूर्ण युद्धासाठी तयार राहावं. आपण त्यांचा श्वास रोखू. आपल्याकडे असलेली क्षेपणास्त्रे आणि लष्करी उपकरणे केवळ प्रदर्शनासाठी नाहीत. घौरी, शाहीन आणि गझनवी सारखी क्षेपणास्त्रे तसेच सुमारे १३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी ठेवलीत. देशाच्या कोणत्या कोपऱ्यात आपण आपली अण्वस्त्रे लपवली आहेत हे कोणालाही माहिती नाही. पाकिस्तानची १३० अण्वस्त्रे भारताला लक्ष्य करण्यासाठी पूर्णपणे तैनात आहेत, असा इशारा अब्बासी यांनी दिला. ते म्हणाले की, भारताला हे माहित आहे की, आपल्याकडं शस्त्रे आहेत, म्हणूनच ते आपल्यावर हल्ला करत नाहीत.
अब्बासी म्हणाले, जर आपण भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र आणखी काही दिवस बंद ठेवले तर भारतीय विमान कंपन्या दिवाळखोरीत निघतील, असं सांगत इस्लामाबाद त्यांच्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही आर्थिक कारवाईला तोंड देण्यास तयार आहे, असंही अब्बासी म्हणाले.
निकमांना दिवसाला लाखांचं मानधन, इतर वकिलांना फक्त…; सपकाळांची सरकारच्या दुटप्पीपणावर टीका
पुढं अब्बासी म्हणाले की, भारत आपल्या सुरक्षेतील त्रुटी स्वीकारण्याऐवजी पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोष देत आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी भारत टाळत असल्याचा आरोप अब्बासी यांनी केला.
दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगामजवळील बैसरन येथे पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. यामध्ये २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा समावेश होता. तसेच १० हून अधिक लोक जखमी झाले. या क्रूर हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानी नेत्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. यावर आता भारत सरकार काय निर्णय घेणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.