‘काश्मीर आमचे आहे, आम्ही मोठ्या संख्येने येणार’ … अभिनेता अतुल कुलकर्णी पोहोचला पहलगाममध्ये

‘काश्मीर आमचे आहे, आम्ही मोठ्या संख्येने येणार’ … अभिनेता अतुल कुलकर्णी पोहोचला पहलगाममध्ये

Actor Atul Kulkarni Visit Pahalgam : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालाय. हल्ल्याला 5 दिवस होत नाही तेच अभिनेता अतुल कुलकर्णीने (Atul Kulkarni) पहलगामला भेट दिली आहे. ते सध्या पहलगामध्ये आहेत. मी काश्मीरला (Pahalgam) आलोय, तुम्हीसुद्धा या…, असं आवाहन अतुल कुलकर्णीने काश्मीरकडे पाठ फिरवणाऱ्या पर्यटकांना केलं आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना अतुल कुलकर्णी यांनी म्हटलंय की, जी पण घटना (Pahalgam Terror Attack) घडली आहे, ती अत्यंत दु:खद घटना आहे. चांगलं नाही झालं. परंतु या दुर्घटनेनंतर आपण काय करू शकतो? आपण केवळ सोशल मीडियावर लिहू शकतो. आपण केवळ बोलतो. परंतु तिथे जावून मी काय करू शकतो? काय कृती करू शकतो? असा प्रश्न माझ्या मनात आला. पिकनिकचा सिझन असून सुद्धा 90 टक्के बुकिंग कॅन्सल झाल्या, असं माझ्या कानावर पडलं होतं. तरी देखील मी पहलगाममध्ये येण्याचा निर्णय घेतला.

काश्मिरीयत जी आहे, ती आपल्याला सांभाळावी लागेल. काश्मिरी लोकांना आपल्याला सांभाळायचं आहे. पर्यटन केवळ पर्यटन नसतं. हा फक्त पैशांचा विषय नसतो. पर्यटन म्हणजे लोकं एकमेकांसोबत जोडले जातात. मागील काही दिवसांत मोठ्या संख्येने लोक येत होते, आपण जर अचानक यायचो थांबलो. तर जे नातं तयार होतंय ते थांबू नये, असं मला वाटतं.

डेडलाईन संपली! आतापर्यंत किती पाकिस्तान्यांनी देश सोडला? किती भारतीय मायदेशी परतले?

मला इथे यायचं आहे, असा मी कालच निर्णय घेतला. लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवायचा आहे. जर आपल्याला आतंकवाद्यांना जिंकू द्यायचं नसेल तर खूप सगळे उपाय शासन-प्रशासन करीत राहील. परंतु आपल्याला आतंकवाद्यांनी संदेश दिलाय की, येथे येवू नका. त्यांना सांगायचं, नाही आम्ही तर येणार. आमचं काश्मीर आहे. आम्ही येथे येणारच. खूप मोठ्या संख्येने येणार. बुकींग कॅन्सल करू नका. येथे या. येथे खूपच सुरक्षितता आहे.

काहीजण कोंबडीवाले म्हणतात… पण भ्रष्टाचारापेक्षा व्यवसाय चांगला; नारायण राणेंचा रोख नेमका कोणाकडे?

तुम्ही सगळे बघतच आहात की, खूप मोठ्या संख्येने येथे या. जर तुम्ही इतर कुठे जाण्याचा प्लॅन बनवला असेल तर तो कॅन्सल करून येथे या. परंतु काश्मिरला या. काश्मिरीयतला सांभाळणं खूप गरजेचं आहे. काश्मिरींना प्रेम अन् चेहऱ्यावर हसू आणणं गरजेचं आहे. एक दुर्घटना झाली, ही खूप वाईट गोष्ट आहे. त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करू या. आपल्या मनात असलेल्या भीतीला बाहेर काढू या, असं आवाहन अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube