काहीजण कोंबडीवाले म्हणतात… पण भ्रष्टाचारापेक्षा व्यवसाय चांगला; नारायण राणेंचा रोख नेमका कोणाकडे?

Narayan Rane Criticized Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अन् राणे कुटुंब यांच्यातील आरोप-प्रत्यारोप नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी सतत होणाऱ्या टिकेवर भाष्य केलंय. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, काहीजण त्यांचा कोंबडीवाले असा उल्लेख करतात. परंतु भ्रष्टाचार करण्यापेक्षा बिझनेस करणं कधीही चांगलं असं नारायण राणे यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
नारायण राणे म्हणाले की, काही लोक कोंबडीवाले म्हणून उल्लेख करतात. करप्शन (Corruption) करण्यापेक्षा धंदा केलेला बरा. कोविडच्या काळात औषधाला पंधरा टक्के …औषधातून पैसे खाण्यापेक्षा धंदा बरा. जे खातात ते तुम्हाला माहित आहेत. अगदी मातोश्रीपासून त्यांची नावं लिस्टमध्ये आहेत. यांची इन्क्वायरी चालु आहे. कोरोना काळातील भ्रष्ट्राचारावरून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला आहे.
“माझेही फ्लेक्स काढून टाका, ज्यांना जाहिरातबाजीची खुमखुमी असेल..”, फडणवीसींचे तिखट बोल कुणासाठी?
मी 1982 ला चिकनचा व्यवसाय मुंबईत सुरू केला. त्यावेळी चांगलं दुकान (Maharashtra Politics) अगदी व्यवस्थित होतं. त्यावेळी मला 64 हजार नेट यायचे खर्च जावून, असं देखील नारायण राणे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे (Shivsena) नारायण राणे यांना नेहमीच कोंबडी चोर म्हणून डिवचतात. यावर आता नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.
काही लोक धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करतात; पहलगाम हल्लानंतर शरद पवारांचं परखड भाष्य
नारायण राणे यांना कोंबडीचोर का म्हणतात?
कधी काळी नारायण राणे शिवसेनेचे फायरब्रँड नेते होते. तसेच ते बाळासाहेबांचे देखील अत्यंत विश्वासू मानले जात होते. परंतु काही कारणांनी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर स्वत: बाळासाहेब ठाकरे हे राणेंवर प्रचंड टीका करत असे. शिवसेना सोडल्यापासून शिवसैनिक हे वारंवार नारायण राणे यांचा कोंबडीचोर असा उल्लेख करतात. याला आता नारायण राणे यांनी उत्तर दिलंय. त्यांनी ठाकरेंवरच पलटवार करत करोना काळातील घोटाळ्याची आठवण देखील करून दिली आहे. तर भ्रष्टाचार करण्यापेक्षा व्यवसाय करणं कधीही चांगलं असं देखील त्यांनी म्हटलंय.