डेडलाईन संपली! आतापर्यंत किती पाकिस्तान्यांनी देश सोडला? किती भारतीय मायदेशी परतले?

Pahalgam terrorist attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam terrorist attack ) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले. पाकिस्तानला (Pakistan) धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने (Government of India) कठोर पावले उचलली असून, पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले होते. आज (27 एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, वैद्यकीय व्हिसाधारकांना 29 एप्रिलपर्यंत मुदत आहे.
काहीजण कोंबडीवाले म्हणतात… पण भ्रष्टाचारापेक्षा व्यवसाय चांगला; नारायण राणेंचा रोख नेमका कोणाकडे?
वैद्यकीय व्हिसाधारकांना 29 एप्रिलपर्यंत मुदत
भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. सर्व व्हिसा (दीर्घकालीन, राजनैतिक आणि वैद्यकीय व्हिसा वगळता) 27 एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत, तर वैद्यकीय व्हिसाधारकांना 29 एप्रिलपर्यंत मुदत आहे.
अटारी सीमेवर वाहनांच्या रांगा
आज पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे. ही अंतिम मुदत लक्षात घेऊन, राज्य सरकारे त्यांच्या भागात पाकिस्तानी लोकांना शोधत आहेत आणि त्यांना परत पाठवत आहेत. दिल्ली, मुंबई, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे काम वेगाने सुरू आहे. अमृतसर जिल्ह्यातील अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी गर्दी केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या.
भारतीयही पाकिस्तानातून घरी परतू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांत, अटारी-वाघा सीमेवरून 450 हून अधिक भारतीय आपल्या मायदेशी परतले आहेत.
“माझेही फ्लेक्स काढून टाका, ज्यांना जाहिरातबाजीची खुमखुमी असेल..”, फडणवीसींचे तिखट बोल कुणासाठी?
आतापर्यंत किती नागरिक परतले?
भारत सरकारच्या आदेशानंतर अटारी-वाघा आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तान आणि भारतातून परतलेल्या लोकांपैकी 24 एप्रिल रोजी 28 नागरिक त्यांच्या देशात परतले, तर 105 भारतीय नागरिक भारतात परतले. 25 एप्रिल रोजी 191 पाकिस्तानी नागरिक पाकमध्ये परतले आणि 287 भारतीय नागरिक भारतात परतले. तर 26 एप्रिल रोजी 75 पाकिस्तानी नागरिक आणि 335 भारतीय नागरिक आपापल्या देशात परतले.
दरम्यान, अटारी सीमेवर बहुतेक पाकिस्तानी नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ते त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात आले होते. काही लोक लग्न समारंभांना उपस्थित राहण्यासाठी येथे आले होते, पण आता त्यांना लग्न समारंभांना उपस्थित न राहता घरी परतावे लागत आहे.
काही पाकिस्तानी नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि भारत पाकिस्तानमधील मैत्रीपूर्ण संबंधांची अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, भारत सरकारच्या मुदतीनंतर भारतात राहणारे पाकिस्तानी बेकायदेशीर मानले जातील आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.