जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचा पहिला टप्पा संपला, 24 जागांवर 58.85 टक्के मतदान
Jammu Kashmir Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या जम्मू आणि काश्मीर विधानसभा (Jammu Kashmir Election 2024) निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 24 जागांवर एकूण 58.54 टक्के मतदान झाला असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिली आहे. 10 वर्षानंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिला टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 25 सप्टेंबरला होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक 01 ऑक्टोबरला होणार असून निकाल 08 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये एकूण मतदान शांततेत पार पडले. फेरमतदान घ्यावे लागेल, असे कोणतेही प्रकरण नाही. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी पीके पोले यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किश्तवाडमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे.
किश्तवाडमध्ये 77. 23 टक्के तर दोडामध्ये 69. 33 टक्के मतदान झाले तर पुलवामा येथे सर्वात कमी मतदान झाले. पुलवामा येथे 46.03 टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आज जम्मूमधील 8 आणि काश्मीरमधील 16 मतदारसंघात मतदान झाले आहे.
तर दुसरीकडे आज झालेल्या 24 जागांपैकी 11 जागांवर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील PDP ने विजय मिळवला होता तर भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी चार आणि फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स आणि सीपीआय(एम) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58. 19 टक्के मतदान
अनंतनाग: 54.17%
डोडा: 69.33%
किश्तवाड: 77.23%
कुलगाम: 59.62%
पुलवामा: 43.87%
रामबन: 67.71%
सावधान, देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण, UAE मधून परतलेला व्यक्ती पॉझिटिव्ह
शोपियन: 53.64%
Rockstar DSP : रॉकस्टार डीएसपी आणि शिल्पा राव एका नव्या चार्टबस्टरसाठी येणार एकत्र?