Rockstar DSP : रॉकस्टार डीएसपी आणि शिल्पा राव एका नव्या चार्टबस्टरसाठी येणार एकत्र?

  • Written By: Published:
Rockstar DSP : रॉकस्टार डीएसपी आणि शिल्पा राव एका नव्या चार्टबस्टरसाठी येणार एकत्र?

Rockstar DSP : संपूर्ण भारतात कमी वेळेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत राहतो. आता पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नुकतंच तो शिल्पा रावसह (Shilpa Rao) एका स्टुडिओमध्ये दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

रॉकस्टार डीएसपी आणि शिल्पा राव एकत्र दिल्याने ते आगामी चार्टबस्टरसाठी एकत्र येत का? याबाबत सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. डीएसपीने आतापर्यंत ढिंका चिका, रिंगा रिंगा, सामी सामीसह अनेक सुपरहिट गाणे दिले आहे तर शिल्पा रावच्या डिस्कोग्राफीमध्ये बेशरम रंग, कावला, शेर खुल गए सारखे अनेक हिट गाणे दिले आहे. त्यामुळे जर दोन्ही एकत्र येत आहे का? असा प्रश्न आता सोशल मीडियावर उपस्थित करण्यात करण्यात येत आहे. मात्र चाहत्यांना अद्याप कोणतेही उत्तर मिळालेला नाही.

तर दुसरीकडे रॉकस्टार डीएसपीचा इंडिया टूरची सुरुवात 19 ऑक्टोबरपासून हैदराबाद येथून सुरू होणार आहे. रॉकस्टार डीएसपी इतर शहरांची घोषणा करण्यात आलेली नसली तरी तो मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि उत्तर भागांमध्ये टूर करेल अशी अपेक्षा आहे.

नरेंद्र फिरोदिया यांची चौथ्यांदा अहमदनगर क्लबच्या सचिवपदी निवड

याच बरोबर तो या टूरसह आणखी काही जबरदस्त म्युझिक येत्या काही दिवसात लाँच करणार आहे. त्याच्या डिस्कोग्राफीमध्ये अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल’, पवन कल्याणचा ‘उस्ताद भगतसिंग’, धनुषचा ‘कुबेरा’, नागा चैतन्यचा ‘थंडेल’, अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’, सुर्याचा ‘कंगुवा’ आणि राम चरणचा ‘अंटलेड’ चित्रपटांचा समावेश आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय, ‘चांद्रयान-4’ मोहिमेला मंजुरी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube