मोदी सरकारचा मोठा निर्णय, ‘चांद्रयान-4’ मोहिमेला मंजुरी
Chandrayaan-4 : केंद्र सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेत चांद्रयान-4 मोहिमेला (Chandrayaan-4) मजुरी दिली आहे. याच बरोबर या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या (One Nation, One Election) प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे तसेच व्हीनस मिशन, इंडियन स्पेस स्टेशन आणि पुढील पिढीतील प्रक्षेपण वाहने विकसित करणे या सारख्या प्रस्तावांना देखील मजुरी दिली आहे.
चांद्रयान-4 मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परतण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्याची तसेच या मोहिमेअंतर्गत अभ्यास करण्यासाठी चंद्राचे खडक आणि माती देखील पृथ्वीवर आण्याची इस्रोची योजना आहे.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्हीनस ऑर्बिट मिशन, गगनयान आणि चांद्रयान-4 मोहिमांच्या विस्ताराला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे तसेच जड भार वाहून नेण्यास सक्षम असलेल्या पुढील पिढीच्या प्रक्षेपण वाहनालाही मान्यता देण्यात आली आहे. असं मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
माहितीनुसार, चांद्रयान-4 मिशन 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्यासाठी आणि त्यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यासाठी मुख्य तंत्रज्ञान विकसित करणार आहे. या मोहिमेअंतर्गत डॉकिंग/अनडॉकिंग, लँडिंग, पृथ्वीवर सुरक्षित परतणे आणि चंद्रावरून नमुना संकलन आणि विश्लेषण पूर्ण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. याच बरोबर या मोहिमेसाठी एकूण 2,104.06 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असणार आहे.
गगनयान मिशन
या मोहिमेवर इस्रो आधीच काम करत आहे. या मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. सध्या अंतराळवीरांची निवड देखील करण्यात आली आहे आणि त्याचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे.
महिलांना दोन हजार रुपये, 25 लाखांपर्यंत मोफत उपचार, विधानसभेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या प्रस्तावालाही मंजुरी
तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाने एकमताने ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळासमोर आज विषयावर गठित उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर करण्यात आला होता तो एकमताने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देखील केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.