सावधान, देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण, UAE मधून परतलेला व्यक्ती पॉझिटिव्ह

  • Written By: Published:
सावधान, देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण, UAE मधून परतलेला व्यक्ती पॉझिटिव्ह

Monkeypox Second Case In India : देशात आणखी एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, UAE मधून परतलेल्या एका 38 वर्षीय व्यक्तीला लागण झाली आहे. केरळ सरकारने (Kerala Government) याची पुष्टी केली आहे.

केरळचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, मलप्पुरममधील 38 वर्षीय पुरुषाची यूएईहून परतल्यानंतर टेस्ट करण्यात आली होती. ज्याची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या या रुग्णाला वेगळे करण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार उपचार करण्यात येत असल्याची माहिती देखील केरळचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

काही दिवसापूर्वी देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण समोर आला होता. हे प्रकरण दिल्लीमध्ये नोंदवले गेले होते. तर दुसरीकडे WHO ने Mpox ला आफ्रिकेच्या अनेक भागांमध्ये पसरलेल्या आणि त्याचा प्रसार झाल्यामुळे दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHEIC) घोषित केली.

Rockstar DSP : रॉकस्टार डीएसपी आणि शिल्पा राव एका नव्या चार्टबस्टरसाठी येणार एकत्र?

एमपॉक्स संसर्ग सामान्यतः फक्त पीडितेपर्यंतच मर्यादित असतो. हे दोन ते चार आठवडे टिकते आणि रुग्ण सामान्यतः वैद्यकीय सेवेने बरे होतात. संक्रमित रूग्णाच्या दीर्घकाळ आणि जवळच्या संपर्कातून ते पसरते. निपाह संसर्गामुळे 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर केरळमधील एमपीऑक्सची ही पहिलीच घटना नुकतीच समोर आली आहे.दरम्यान, मंकीपॉक्सचा रुग्ण आढळताच केंद्र सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आलायं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

नरेंद्र फिरोदिया यांची चौथ्यांदा अहमदनगर क्लबच्या सचिवपदी निवड

काय आहेत मार्गदर्शक सूचना?

राज्य आणि जिल्हा स्तरावरील आरोग्य सुविधांचा वरिष्ठ अधिकारी आढावा घेणार आहेत.

संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी रुग्णालयांत सुविधा उपलब्ध करुन देणे.

विशेष व्यवस्थेमध्ये कर्मचाऱ्यांची उपलब्धताही करण्यात यावी.

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून मंकीपॉक्सच्या लक्षणानंतर काय केलं पाहिजे याबाबतची माहिती देण्यात यावी.

रुग्णालयात राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेकडून स्क्रीनिंग आणि तपासणीची व्यवस्था असावी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube