WHO कडून Mpox लसीला मान्यता, लसीकरणाची ‘या’ देशात होणार सुरुवात

  • Written By: Published:
WHO कडून Mpox लसीला मान्यता, लसीकरणाची ‘या’ देशात होणार सुरुवात

Mpox Vaccine : कोरोना महामारीनंतर Mpox या आजाराने संपूर्ण जगात भीती पसरली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) खबरदारी उपाय म्हणून प्रौढांसाठी पहिली Mpox लसीला (Mpox Vaccine) मान्यता दिली आहे. यामुळे आता आफ्रिका आणि इतर देशांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. आफ्रिकेत आणि इतर देशांना या रोगाशी लढा देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

माहितीनुसार, UNICEF सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था Bavarian Nordic कंपनीची ही लस खरेदी करू शकतील. मात्र, त्याचा पुरवठा मर्यादित असेल. लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याची खात्री करणे हे लस प्री कॉलिफिकेशनचे ध्येय आहे. डब्ल्यूएचओनुसार ही लस 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना दोन डोसमध्ये दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे ही लस सध्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी परवानाकृत नसली तरी ती लहान मुले, आणि किशोरवयीन मुलांमध्ये वापरली जाऊ शकते जेथे लसीकरणाचे फायदे संभाव्य जोखमींपेक्षा जास्त असल्याची माहिती डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी दिली आहे.

आफ्रिकेमध्ये होणार लसीकरण

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमपॉक्स विरूद्ध लसीची ही पहिली प्री कॉलिफिकेशन आफ्रिकेतील सध्याच्या उद्रेक आणि भविष्यातील रोगांविरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. UN आरोग्य एजन्सीच्या प्रमुखांनी इतर प्रतिसाद उपायांसह लस अधिक आवश्यक असलेल्या ठिकाणी मिळविण्यासाठी खरेदी, देणग्या आणि रोलआउटच्या प्रमाणात त्वरित वाढ करण्याचे आवाहन केले.

दौंडमधून शरद पवारांचा नवा भिडू मैदानात, डॉ.भरत खळदकर यांना विधानसभेसाठी संधी?

mpox ची लक्षणे  

आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँगोमधील सुमारे 70 टक्के प्रकरणे  मुलांमध्ये आहेत. mPox ला यापूर्वी मंकी पॉक्स म्हणून ओळखले जात असे. mPox एक संसर्गजन्य रोग आहे. पुरळ येणे, फोड येणे, ताप येणे, अंग दुखणे ही mPox ची प्रमुख लक्षणे आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube