Japan Mpox : टेन्शन वाढलं! जपानमध्ये ‘या’ घातक आजाराचा पहिला बळी; WHO अलर्ट
Japan Mpox News : चीनमधील न्युमोनियानंतर जपानमध्ये आणखी एका आजाराने एन्ट्री घेतल्याने खळबळ उडाली आहे. एमपॉक्सने (Japan Mpox) संक्रमित होऊन एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जपानच्या आरोग्य मंत्रालयानेही याची खात्री केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एमपॉक्स संक्रमणामुळे देशातील हा पहिला मृत्यू झाला आहे. जपानमधील सैतामा प्रांतात राहणाऱ्या व्यक्तीचा मृ्त्यू झाला. रॉयटर्सनुसार, मंत्रालयाने सांगितले की हा व्यक्ती इम्युनोडेफिशिएन्सीने ग्रस्त होता. विशेष म्हणजे, मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्स जागतिक आरोग्य आणीबाणी नाही असे जाहीर केले होते. मात्र, आता आरोग्य संघटनेला आपल्या या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.
एमपॉक्स या आजाराला आधी मंकीपॉक्स या नावाने ओळखले जात होते. मागील वर्षातील नोव्हेंबर महिन्यात या आजाराचे नाव बदलून एमपॉक्स ठेवण्यात आले. मागील वर्षातील जुलै महिन्यात जपानमध्ये या आजाराचे संक्रमित रुग्ण सापडले होते. याच महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती.
China : ‘कोरोना’ नाही ‘या’ आजाराने चीन हैराण! शाळा बंद, WHO ने मागितला अहवाल
या आजाराची लक्षणे फ्लू सारखीच आहेत. संक्रमित व्यक्तीच्या सरळ संपर्कात आल्याने हा आजार फैलावतो. बहुतांश प्रकरणे गंभीर नसतात मात्र काही प्रकरणांत जीवही जाऊ शकतो. या आजाराने पीडित रुग्णात तीव्र ताप, डोके दुखणे अशी लक्षणे दिसतात.
एमपॉक्स कसा फैलावतो ?
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) नुसार, हा विषाणू संक्रमित प्राणी किंवा व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रवपदार्थांच्या संपर्कात आल्याने, संक्रमित प्राण्याचा चावा आणि स्पर्श या कारणांमुळे फैलावतो. उंदीर आणि माकडांच्या माध्यामातून हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरतो.
उपाय काय?
या आजारापासून संरक्षण करायचा असेल तर संक्रमित प्राणी तसेच आजारी आणि मृत प्राण्यांचा संपर्क टाळावा. तज्ज्ञांच्या मते मांसाहारी खाद्यपदार्थ चांगल्या पद्धतीने शिजून घ्यावेत.