सावधान! शारीरिक श्रमाअभावी भारतीय होताहेत आळशी; WHO चा धक्कादायक अहवाल

सावधान! शारीरिक श्रमाअभावी भारतीय होताहेत आळशी; WHO चा धक्कादायक अहवाल

WHO Report : ग्लोबल हेल्थ मगेझिन लॅन्सेटने भारतीय नागरिकांच्या आरोग्याबाबत एक चमत्कारिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार पन्नास टक्के भारतीय इतके आळशी झाले आहेत की रोज आवश्यक शारीरिक श्रम देखील करत नाहीत. यामध्ये भारतीय महिलांची संख्या जवळपास 57 टक्के आहे. या महिलांमध्ये आळशीपणा वाढला आहे. यामध्ये पुरुषांची संख्या 42 टक्के इतकी आहे. आवश्यक प्रमाणात फिजिकली ॲक्टिव्ह नसणाऱ्या महिलांचे दक्षिण आशियातील (South Asia) प्रमाण पुरुषांच्या तुलनेत 14 टक्के जास्त आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण 42 टक्के आहे.

आळसामध्ये दक्षिण आशिया दुसरा

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) आवश्यक प्रमाणात फिजिकली अक्टिव्ह नसण्याच्या बाबतीत दक्षिण आशियाचा दुसरा क्रमांक आहे. जास्त उत्पन्न असणारा आशिया पॅसिफिक प्रदेश याबाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. संशोधकांनी फक्त भारतच (India) नाही तर जगभरातून माहिती गोळा केली आहे. फिजिकली ॲक्टिव्ह नसणाऱ्या लोकांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे दिसून आले की जगातील 31.3 टक्के लोक रोजचे आवश्यक शारीरिक श्रम देखील करत नाहीत.

Japan Mpox : टेन्शन वाढलं! जपानमध्ये ‘या’ घातक आजाराचा पहिला बळी; WHO अलर्ट

शोधकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आवश्यक शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींनी आठवड्यात किमान 150 मिनिटांची मॉडरेट इंटेसिटी असणारी फिजीकल ॲक्टिव्हीटी करावी किंवा आठवड्यात 75 टक्के हाय इंटेंसिटी असणारी फिजिकल ॲक्टिविटी करणे गरजेचे आहे.

या रिसर्चनुसार सन 2010 मध्ये फिजिकल ॲक्टीविटी न करणाऱ्या लोकांचे प्रमाण 26.4 टक्के इतके होते. 2022 मध्ये यामध्ये पाच टक्के वाढ नोंदवण्यात आली. सन 2000 मध्ये जवळपास 22 टक्के भारतीय लोक आवश्यक शारीरिक श्रम देखील करत नव्हते. 2010 मध्ये हा आकडा वाढून 34 टक्के झाला. तर 2022 मध्ये भारतात अशा लोकांची संख्या 50 टक्के झाली.

2030 पर्यंत 60 टक्के भारतीय आळशी होणार

जर भारतात या लोकांची संख्या अशीच वाढत राहिली तर 2030 पर्यंत देशात आळशी लोकांची संख्या 60 टक्के होण्याची भीती आहे. या पद्धतीचे निष्कर्ष काढण्यासाठी शोधकर्त्यानी लोकांनी सांगितलेल्या शारीरिक व्यायामाच्या माहितीचे विश्लेषण केले. शोधकर्त्याना असेही दिसून आले की जगात साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे पुरुष आणि महिला दोघांतही शारीरिक निष्क्रियतेचा दर वाढत आहे.

धक्कादायक! देशात 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण; WHO कडून आकडेवारी जाहीर

फिजिकली जास्त ॲक्टीव राहत नसल्याने लोकांना अनेक शारीरिक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. इंडीयन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इंडिया डायबिटिजचा एक संशोधन अहवाल द लन्सेटच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. या अहवालानुसार सन 2021 मध्ये भारतात 10.1 कोटी लोक मधुमेह ग्रस्त होते. तर 31.5 कोटी लोक उच्च रक्तदाब ग्रस्त होते. या अहवालानुसार 25.4 कोटी लोक लठ्ठपणाच्या ग्रस्त होते. तर 18.5 कोटी लोक हाय कोलेस्टेरॉल समस्येला तोंड देत होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज