धक्कादायक! देशात 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण; WHO कडून आकडेवारी जाहीर

  • Written By: Published:
धक्कादायक! देशात 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण; WHO कडून आकडेवारी जाहीर

WHO Repoert High blood pressure : सध्याचं तणावग्रस्त जीवन, अवेळी जेवण आणि व्यायामाचा अभाव यामुळं अवतीभवती अनेक उच्च रक्तदाबाचे (High blood pressure) रुग्ण आढळतात. दरम्यान, आता जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील उच्च रक्तदाब रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, 1990 ते 2019 दरम्यान उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. एकट्या भारतात सुमारे 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत.

उच्च रक्तदाबाचे रुग्ण 1990 मध्ये 65 कोटींवरून 2019 मध्ये 130 कोटींवर पोहोचले आहेत. यापैकी 1 कोटी 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू केवळ उच्च रक्तदाबामुळेच झाल्याची माहिती आहे. म्हणजे, त्यांचे बीपी नियंत्रणात असते तर आज या लोकांचा मृत्यू झाला नसता, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर, सुमारे 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत.

र्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांपैकी अर्ध्या रुग्णांना उच्च रक्तदाब आहे हे माहित नसते. जगातील 30 ते 79 वयोगटातील उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांपैकी केवळ अर्धे 54% असे आहेत ज्यांना उच्च रक्तदाबाब असल्याचं माहित आहे. ४२% रुग्णा सध्या उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत. जगातील केवळ 21% रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात आहे.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हँगिग गार्डन सात वर्षांसाठी होणार बंद 

अहवालात सांगितलं की, 5 पैकी 4 जणांना योग्य उपचार मिळत नाहीत. शिवाय, जगातील प्रत्येक 3 पैकी 1 व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, किडनी खराब होण्याचा धोका असतो.

WHO च्या 2019 च्या आकडेवारीनुसार, भारतात 18.8 दशलक्ष उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत. यापैकी ३७ टक्के रुग्णांना त्यांच्या आजाराची माहिती आहे. 30 टक्के उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत. भारतात केवळ १५ टक्के रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. या अहवालानुसार, भारतात 25 लाख 66 हजार लोक हृदयविकाराचे बळी ठरले आहेत. यामध्ये 14 लाख 51 हजार पुरुष आणि 11 लाख 16 हजार महिला आहेत.

दरम्यान, उच्च रक्तदाब टाळायचा छअसेल तर मिठाचं प्रमाण कमी करणं, अल्कोहोल आणि कॅफेनचं सेवण टाळावं, असं तज्ञ सांगतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube