अरे बापरे! दर मिनिटाला एका महिलेचा कॅन्सरने मृत्यू, WHO चा धक्कादायक अहवाल

One woman dies of cancer every minute WHO report : दर मिनिटाला एका महिलेचा कॅन्सरने (Cancer) मृत्यू होतो, असं समोर आलंय. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल प्रसिद्ध केलाय. दर मिनिटाला एक महिला स्तनाच्या कर्करोगाने मरत (Health News) आहे. हा आकडा नक्कीच भयावह आहे, परंतु महिलांनी या आजाराबद्दल जागरूक राहणं अधिक महत्त्वाचे (WHO report) आहे. योग्य वेळी चाचणी करून आणि जीवनशैलीत छोटे बदल करून हा गंभीर आजार टाळता येतो.
जागतिक आरोग्य संघटनेने स्तनाच्या कर्करोगाबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूंबद्दल चिंता व्यक्त केलीय. जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडील अहवालाच्या आधारे स्तनाच्या कर्करोगाबाबत इशारा दिलाय. येत्या काही वर्षांत जगभरात स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढेल, असा अंदाज WHO ची कर्करोग संस्था आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC) यांनी व्यक्त केलाय. या अभ्यासातून दिसून आलंय की, जगात दर मिनिटाला एक महिला स्तनाच्या कर्करोगाने मरत आहे. WHO ने देखील याची अनेक कारणे दिलीत. यामध्ये खाण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली आणि वाढते वय यासारख्या अनेक समस्यांचा समावेश आहे.
आज कुंभमेळ्याचा शेवटचा दिवस; पहाटेपासून प्रयागराजमध्ये गर्दी, ४५ लाख भाविकांनी केलं स्नान
WHO च्या कर्करोग एजन्सी आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) चा हा अहवाल नेचर मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. एका नवीन अहवालात स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणांबद्दल इशारा देण्यात आला आहे.
स्तनाच्या कर्करोगाची आकडेवारी
जागतिक आरोग्य संघटनेची कर्करोग संस्था आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC) यांनी म्हटलंय की, 2050 पर्यंत जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि मृत्यू वाढण्याची अपेक्षा आहे. IARC च्या एका अभ्यासानुसार 2022 मध्ये जगभरात सुमारे 23 लाख महिलांवर स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यात आले. ज्यामध्ये 6,70.000 महिलांचा मृत्यू झाला.
आज देशरात महाशिवरात्रीचा उत्साह; शिव भक्तांसाठी खास दिवस, उपवासासाठी बनवा ‘हे’ पदार्थ
पुढील 25 वर्षांत या धोकादायक आजारामुळे होणाऱ्या रुग्णांमध्ये 38 टक्के वाढ आणि मृत्यूंमध्ये 68टक्के वाढ होऊ शकते, असं डब्ल्यूएचओने म्हटलंय. नवीन अभ्यासात असंही म्हटलंय की, जर हा आजार याच वेगाने पसरत राहिला तर 2050 पर्यंत जगभरात दरवर्षी 32 लाख नवीन रुग्ण आणि 1.1 दशलक्ष मृत्यू होतील.
येत्या काळात आणखी मृत्यू होण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की, जगभरात स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये आणि मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ होईल. त्याचा परिणाम विशेषतः भारत आणि इतर विकसनशील देशांवर अधिक दिसून येईल. आयएआरसीच्या शास्त्रज्ञ डॉ. जोन किम म्हणाल्या की, दर मिनिटाला, जगभरात चार महिला स्तनाच्या कर्करोगावर उपचार घेत आहेत. तर एका महिलेचा या आजाराने मृत्यू होतोय.