“माझेही फ्लेक्स काढून टाका, ज्यांना जाहिरातबाजीची खुमखुमी असेल..”, फडणवीसींचे तिखट बोल कुणासाठी?

“माझेही फ्लेक्स काढून टाका, ज्यांना जाहिरातबाजीची खुमखुमी असेल..”, फडणवीसींचे तिखट बोल कुणासाठी?

Devendra Fadnavis : ‘अनधिकृत फ्लेक्सवर टाच आणण्याची गरज आहे. ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावण्याची खुमखुमी आहे त्यांनी जे अधिकृत होर्डिंग आहेत त्याच्यावर आपली जाहीरातबाजी केली पाहिजे’, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फ्लेक्स लावून जाहीरातबाजी करणाऱ्या मंडळींना सुनावलं. जर माझ्या स्वतःचे जरी अनधिकृत फ्लेक्स कार्यकर्त्यांनी लावले असतील तर तेही काढून टाका हेही सांगायला फडणवीस विसरले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शहरांतील अनधिकृत फ्लेक्स आणि त्यावरील जाहीरातबाजीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना याच अनधिकृत फ्लेक्सबाबत प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, अनधिकृत फ्लेक्सवर टाच आणण्याची गरज आहे. ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावण्याची खुमखुमी आहे त्यांनी जे अधिकृत होर्डिंग आहेत त्याच्यावर आपली जाहीरातबाजी केली पाहिजे. फ्लेक्स लावू नयेत. मी स्वतः सगळ्या महापालिकांना सांगितलं आहे की माझ्या स्वतःचे जरी अनधिकृत फ्लेक्स कार्यकर्त्यांनी लावले असतील तर तेही काढून टाका अशा सूचना मी दिल्या आहेत. यावर आता कडक भूमिका घ्यावी लागेल कारण यामुळे आपली शहरे विद्रूप होत आहेत.

“गृहमंत्री म्हणून सांगतो एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही”; CM फडणवीसांचं मोठं विधान

एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही

फडणवीस म्हणाले, मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतोय कृपया यावर उलट्यासुलट्या बातम्या (प्रसारमाध्यमे) करू नका. 107 नागरिक बेपत्ता झाले असे म्हणता असे काही नाही एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेला नाही. जितके पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडले आहेत. सगळ्यांना पाकिस्तानात पाठवण्याची व्यवस्था केली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक येथे राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत त्यांना परत पाठवलं जाईल.

राज्यात पाच हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी

नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहेत. नागपुरात 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले आहेत तर ठाण्यात 1 हजार 106 नागरिक आढळून आले आहेत. मुंबईमध्ये 14 पाकिस्तानी नागरिक राहतात अशी माहिती समोर आली आहे. या नागरिकांपैकी फक्त 51 नागरिकांकडे वैध कागदपत्रे मिळाली आहेत तर 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेला नाही असे सांगितले.

“काही लोक घरातून बाहेर पडले की थेट..”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube