VIDEO: युद्ध भडकणार ! इस्रायलवर हिजबुल्लाहकडून ड्रोन हल्ले; इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर

हिजबुल्ला कमांडर फुआद शुकरच्या हत्येचा बदला घेण्याची धमकीही हिजबुल्लाहूने दिलीय. उत्तर इस्रायलमधील दोन लष्करी ठिकाणांवर ड्रोन हल्ला केले आहेत.

Hezbollah Launched A Series Of Drone

Hezbollah Launched A Series Of Drone

Hezbollah launches drones at military targets in northern Israel: इराण समर्थक दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा कमांडर हज मोहसीन उर्फ ​​फुआद शुकर (Haj Mohsin alias Fuad Shukar) याची संशयितपणे हत्या झालीय. इस्रायलने ही हत्या केल्याचे बोलले जात आहे. शुकर याचा मृतदेहही सापडलेला नाही. त्याचा बदला घेण्यासाठी हिजबुल्लाहने आता इस्रायलवर ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. मंगळवारी उत्तर इस्रायलमधील (Israel) लष्करावर हल्ले करण्यासाठी ड्रोन सोडले असल्याचे लेबनॉनच्या हिजबुल्लाहकडून (Hezbollah) सांगण्यात आले.

हिजबुल्ला कमांडर फुआद शुकरच्या हत्येचा बदला घेण्याची धमकीही हिजबुल्लाहूने इस्रायलला दिली आहे. उत्तर इस्रायलमधील दोन लष्करी ठिकाणांवर ड्रोन हल्ला केले आहेत. तर इस्रायली लष्करी वाहनावर हल्ला झालाय. तर याबाबत इस्रायली लष्कराने एक स्पष्टीकरण दिले आहे. लेबनॉनमधून सोडण्यात आलेल्या ड्रोनपैकी एकाला रोखण्यात आले. ड्रोन हल्ल्यात नाहरिया या किनारी शहराच्या दक्षिणेला अनेक नागरिक जखमी झाले आहेत. रॉयटर्सच्या टीव्ही फुटेजमध्ये शहराबाहेरील एका मुख्य रस्त्यावर बस स्टॉपजवळ असा हल्ला झाला असे म्हटले आहे. एका ठिकाणी सायरन वाजले, परंतु ते खोटे अलार्म असल्याचे निष्पन्न झाले. तर इस्रायलच्या हवाई दलाने दक्षिण लेबनॉनमधील दोन हिजबुल्लाह केंद्रांवर हल्ला केला आहे.


मध्य पूर्वमधील परिस्थिती चिघळली

मध्य पूर्वेमध्ये सध्या युद्धाची परिस्थिती आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरूच आहेत. त्यात हिजबुल्ला या संघटनेने इस्रायलवर थेट ड्रोनद्वारे हल्ले सुरू केले आहेत. सोमवारी व मंगळवारी हिजबुल्लाकडून उत्तर इस्रायलवर ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. त्यात काही क्षेपणास्त्र इस्रायलकडून नष्ट करण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या हल्लामध्ये इस्रायलचे काही सैनिक जखमी झाले आहेत. हिजबुल्ला संघटनेकडून लेबॅनान भागातून इस्रायलवर हल्ले केले जात आहे. इस्रायलनेही प्रत्युत्तर देत हल्ले केले आहेत.

Exit mobile version