Iran- Israel Conflict : गेल्या दोन वर्षांपासून इस्त्रायल हमासविरुद्ध युद्ध करत आहे तर आता इराणवर देखील इस्त्रायलने (Iran- Israel Conflict) हवाई हल्ले सुरु केले आहे. त्यामुळे इस्त्रायलच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा फटका बसत असल्याची माहिती समोर आली आहे. इस्त्रायली सैन्याचे माजी आर्थिक सल्लागार ब्रिगेडियर जनरल रीम अमिन (Reem Amin) यांनी दावा केला आहे की हल्ले करण्यासाठी इस्त्रायल एका दिवासात तब्बल 725 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 6300 कोटी रुपये खर्च करत आहे. तसेच इराणशी सुरु असलेल्या तणावाच्या पहिल्या दोन दिवसात इस्त्रायलने 593 दशलक्ष डॉलर्स खर्च केले असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
इस्त्रायली सैन्याचे माजी आर्थिक सल्लागार ब्रिगेडियर जनरल रीम अमिन यांनी केलेल्या दाव्यानुसार, इस्रायल क्षेपणास्त्र इंटरसेप्टर्स, सैन्य तैनात करणे, क्षेपणास्त्रे आणि संरक्षण प्रणालींवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. तर दुसरीकडे Ynet न्यूजच्या वृत्तानुसार इस्त्रायल जेट इंधन आणि शस्त्रांवर दररोज 26 अब्ज रुपये खर्च करत आहे. त्यामुळे आता इस्त्रायलला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
इस्त्रायलमध्ये युद्धामुळे उत्पादन देखील कमी झाले आहे. तसेच सध्या युद्धासाठी इस्त्रायल त्यांच्या राखीव सैन्याला देखील मैदानात आणत असल्याने इस्त्रायलचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. तर दुसरीकडे इस्त्रायलला इराणने दिलेल्या प्रत्युत्तर मुळे इस्त्रायलमध्ये पायभूत सुविधांचेही खूप नुकसान झाले आहे.
इस्रायलने या वर्षी जीडीपीच्या सुमारे 4.9 टक्के किंवा 27.6 अब्ज डॉलर्सची वित्तीय तूट निश्चित केली होती. इस्रायलच्या जीडीपी वाढीचा अंदाजही 4.3 वरून 3.6 टक्के करण्यात आला असल्याने त्यांची आर्थिक विकासाची गती मंदावत आहे.
निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातचे बाहुले, 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
इस्रायलचे संरक्षण बजेट आता जीडीपीच्या सात टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. अहवालात असे म्हटले आहे की इस्रायलमध्ये आता इंटरसेप्टर्सचीही कमतरता आहे. इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची किंमत दररोज २०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत आहे.