Iran-Israel Conflict : हल्ला करणार नाही पण लेबनॉनला टार्गेट केलं तर प्रत्युत्तर ; इराणने दिला इशारा

Iran-Israel Conflict : गेल्या काही दिवसांपासून लेबनॉनवर इस्त्रायलकडून करण्यात येणाऱ्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्त्रायलवर

Iran Israel Conflict

Iran Israel Conflict

Iran-Israel Conflict : गेल्या काही दिवसांपासून लेबनॉनवर इस्त्रायलकडून करण्यात येणाऱ्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्त्रायलवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली होती. या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा जगात युद्ध सुरु होणार का? याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता इराणच्या लष्करी संयुक्त कमांडने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, इराण इस्त्रायलवर सध्या हल्ले करणार नाही. त्यांच्याकडून राबविण्यात येणारी मोहिम सध्या स्थगित करण्याचा निर्णय इराणकडून घेण्यात आला आहे.

इराणकडून हल्ले थांबवण्याची घोषणा

याबाबत घोषण करताना इराणाच्या सशस्त्र दलांनी सांगितले की, त्यांनी हल्ले तात्पुरते थांबवले असले तरी इस्त्रायलने लेबनॉन किंवा इराणी भूभागावर पुन्हा कोणतीही आक्रमक कारवाई केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यात येईल. इस्त्रायलवरील हल्ले हे झिओनिस्ट राजवट आणि त्यांच्या समर्थकांना धडा शिकवण्यासाठी केलेले प्रत्युत्तर होते असं इराणकडून सांगण्यात आले आहे. इस्त्रायलकडून इराणच्या मध्य आणि पश्चिम भागांना लक्ष्य केले होते त्यानंतर इराणनेही इस्त्रायलवर पुन्हा हल्ले करुन प्रत्युत्तर दिले होते.

कोणत्याही प्रादेशिक युद्धविरामाच्या अटींमध्ये लेबनॉनचा (Lebanon) समावेश केला जावा, अशी भूमिका इराणने दीर्घकाळापासून मांडली आहे. इस्रायलने (Iran-Israel Conflict) बैरूत किंवा लेबनॉनच्या भूभागावर मोठे हल्ले केल्यास  इराण प्रत्युत्तर देईल, असा इशारा इराणी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिला होता. 8 एप्रिल रोजी युद्धविराम लागू झाल्यापासून दोन्ही देशांमधील हा सर्वात गंभीर लष्करी संघर्ष ठरला आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी इशारा दिला की, इस्रायलमुळे पश्चिम आशियात तणाव वाढल्यास त्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील. अमेरिकेच्या समन्वयाशिवाय इस्रायली राजवट कोणतीही कारवाई करेल, यावर कोणाचाही विश्वास नाही; इस्रायली राजवटीच्या आक्रमकतेची जबाबदारी अमेरिकेवर आहे आणि तणाव वाढल्यास त्याचे परिणामही त्यांनाच भोगावे लागतील, असे त्यांनी नमूद केले.

भारतात AI युगाची सुरुवात; केरळ मंत्रिमंडळात एआय मंत्र्यांची नियुक्ती

ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, रविवार आणि सोमवारच्या तीव्र क्षेपणास्त्र देवाणघेवाणीनंतर इस्रायल आणि इराण दोन्ही देश त्वरित युद्धविरामासाठी तयार होते. आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना ट्रम्प यांनी लिहिले, “दोन्ही बाजूंना – इस्रायल आणि इराणला – त्वरित युद्धविराम हवा आहे! अज्ञान किंवा मूर्खपणा आड न आल्यास ‘शांतते’बाबतची अंतिम चर्चा पुढे सरकत आहे. ‘अंतिम करार’ होईपर्यंत नाकेबंदी पूर्णपणे लागू राहील. गोष्टी वेगाने पुढे सरकल्या पाहिजेत. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!”

Exit mobile version