AI Minister : भारतात AI युगाची सुरुवात; केरळ मंत्रिमंडळात एआय मंत्र्यांची नियुक्ती
AI Minister : जगात दररोज बदलत असणाऱ्या तंत्रज्ञानात एआयची मागणी जोर धरत आहे. व्यवसाय, उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामान्य लोकांच्या
AI Minister : जगात दररोज बदलत असणाऱ्या तंत्रज्ञानात एआयची मागणी जोर धरत आहे. व्यवसाय, उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामान्य लोकांच्या जीवनात आता एआयचे महत्व वाढत आहे. एआयची मागणी वाढत असल्याने आता केरळ सरकारने देखील मोठा निर्णय घेत मंत्रिमंडळात एआय मंत्रीची नियुक्ती केली आहे. तर दुसरीकडे केरळसोबत तमिळनाडूनेही याबाबत पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 20 मे 2026 रोजी केरळ (Kerala) हे भारतातील पहिले राज्य बनले आहे ज्याने मंत्रिमंडळात एआयला विशेष महत्व दिले आहे. पी.के कुन्हालीकुट्टी यांच्याकडे उद्योग, वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान, एआय, स्टार्टअप्स, खाणकाम व भूगर्भशास्त्र आणि वस्त्रोद्योग या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केरळ सरकारच्या या निर्णयानंतर देशातील इतर राज्ये देखील याबाबत विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.
तामिळनाडूनेही (Tamil Nadu) एआयची स्वतंत्र जबाबदारी सोपवलीतर दुसरीकडे केरळ सरकारच्या या निर्णयानंतर तामिळनाडू सरकारने देखील एआयसाठी स्वतंत्र खाते निर्माण केले आहे. मुख्यमंत्री सी. विजय (CM Vijay) यांच्या सरकारने आमदार आर.कुमार यांच्याकडे एआय, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवांची जबाबदारी सोपवली आहे. टीव्हीकेने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात एआय मंत्रालय, एआय विद्यापीठ आणि एआय सिटी स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. माहितीनुसार, सरकार आरोग्यसेवा, कृषी, उत्पादन क्षेत्र, भाषा तंत्रज्ञान आणि हवामान विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये एआयसाठी सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचा विचार करत आहे.
कर्नाटकात तंत्रज्ञान मंत्रालय
केरळ आणि तमिळनाडू राज्यात एआयसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येत असताना कर्नाटक राज्याने व्यापक द्दष्टिकोन स्वीकारला आहे. केवळ एआयसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यापेक्षा तंत्रज्ञान मंत्रालय स्थापन करणे हा अधिक व्यावहारिक पर्याय असणार आहे. तंत्रज्ञान सतत विकसित होत असते. भविष्यात जर एआयची जागा एखाद्या नवीन तंत्रज्ञानाने घेतली तर वारंवार मंत्रालयांची पुनर्रचन करणे व्यावहारिक ठरणार नाही अशी प्रतिक्रिया कर्नाटकाचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात देखील एआय विस्तार
महाराष्ट्राने इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे रुपांतर एआय आयुक्तालयात करण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. तसेच एआय पायाभूत सुविधांची उभारणी, रोजगाराच्या संधींना चालना आणि तंत्रिक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने एक समर्पित एआय धोरणही जाहीर केले आहे. या धोरणात एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्स, एआय इनोव्हेशन सिटीज आणि आधुनिक संगणकीय सुविधांच्या उभारणीचा प्रस्ताव आहे.
शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 719 अंकांनी घसरला; नेमकं कारण काय?
तर दुसरीकडे जगभरातील देशांनीही त्यांच्या एआय प्रशासन संरचना बळकट केल्या आहेत. यूएईने 2017 मध्ये जगातील पहिले एआय मंत्री म्हणून ओमर सुलतान अल ओलाम यांची नियुक्ती केली होती.