Ex President of Pakistan Imran Khan Murder? : अफगाण टाइम्सच्या वृत्तानुसार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात हत्या केली असल्याचा दावा अफगाण टाइम्सने केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपण हा दावा करत असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. या बातमीबाबत पाकिस्तान सरकार किंवा जेल प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. अफगाण टाइम्सच्या वक्तव्यानंतर आता बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयानं (Baluchistan)देखील इमरान खान (Imran Khan) यांच्या हत्येच्या बाबतीत मोठा दावा केलाय. बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून इमरान खान यांच्या हत्येसाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि असीम मुनीर (Asim Munir) यांना जबाबदार ठरवलं जातंय. गुप्तचर संस्था आणि असीम मुनीर यांनी कट रचून ही हत्या घडवून आणल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय.
सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाहीये. मात्र रावळपिंडीतील (Ravalpindi)आदियाला तुरुंगाच्या बाहेर या बातमीनंतर PTI समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अशी देखील पोस्ट व्हायरल होतीय की, इमरान खान यांची बहीण आणि त्यांच्या कुटुंबियांना तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांना मारहाण झाल्याचा दावा देखील करण्यात येतोय. त्यामुळे खरंच इमरान खान यांची हत्या झालीय का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. अफगाण टाइम्सने (Afgan Times)दिलेल्या बातमीच्या आधारे बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने इमरान खान यांची हत्या गुप्तचर संस्था आणि असीम मुनीर यांनी केली असल्याचा दावा केलाय.
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला; 25 वर्षांनंतर भारतात जिंकली कसोटी मालिका
अफगाण टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत रावळपिंडीच्या आदियाला जेलमधून बाहेर काढला असल्याचं सांगण्यात आलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार इमरान खान यांनी काही आठवड्यांपूर्वीच आपली हत्या होणार असल्याची भीती व्यक केली होती. ते त्यावेळेस म्हणाले होते की, जेलमद्धे माझ्यासोबत काहीही झाल्यास त्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे सेनाप्रमुख असीम मुनीर हे असतील! दरम्यान या बातमीनंतरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी संस्थेने हाय अलर्ट जारी केलाय.
