मोठी बातमी! पाकिस्तानकडून अनेक हवाई मार्ग बंद, धक्कादायक कारण…

Pakistan Temporarily Close Several Air Routes : भारत आणि पाकिस्तान (India Pakistan) या दोन देशांमधला तणाव काही कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानच्या नव्या निर्णयामुळे आता हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने देशभरातील अनेक महत्त्वाचे हवाई मार्ग (Airport) तात्पुरते बंद करण्यासाठी एक नोटम जारी केला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तान येत्या काही दिवसांत मोठ्या क्षेपणास्त्र चाचणीची […]

WhatsApp Image 2025 08 21 At 5.08.19 PM

WhatsApp Image 2025 08 21 At 5.08.19 PM

Pakistan Temporarily Close Several Air Routes : भारत आणि पाकिस्तान (India Pakistan) या दोन देशांमधला तणाव काही कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानच्या नव्या निर्णयामुळे आता हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने देशभरातील अनेक महत्त्वाचे हवाई मार्ग (Airport) तात्पुरते बंद करण्यासाठी एक नोटम जारी केला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तान येत्या काही दिवसांत मोठ्या क्षेपणास्त्र चाचणीची किंवा एअर-डिफेंस लष्करी सरावाची तयारी करत असल्याच्या अटकळींना उधाण आले (India Ballistic Missile Test) आहे.

भारताने अलिकडेच अग्नि-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. नेमके याच वेळी पाकिस्तानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आपल्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या यशाचा आनंद साजरा करत असताना, पाकिस्तानने आपले हवाई मार्ग बंद करण्याचा घेतलेला निर्णय असुरक्षितता आणि भीतीची प्रतिक्रिया असल्याचे बोलले जाते आहे.

सेंट्रल सेक्शनवरील निर्बंध

पाकिस्तानने जाहीर केले आहे की, इस्लामाबाद आणि नियंत्रण रेषेभोवतीचे (LoC) हवाई क्षेत्र 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 00:00 ते पहाटे 02:30 (UTC) पर्यंत बंद राहील. या काळात नागरी हवाई वाहतूकीला या मार्गांवरून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

गुडन्यूज! 12 आणि 28 टक्के GST स्लॅब संपणार, मंत्रिमंडळाने केंद्राचा प्रस्ताव स्वीकारला

साउदर्न सेक्शनवरही निर्बंध

दक्षिण भागातील लाहोर ते रहिमयार खान, कराची आणि ग्वादर पर्यंतचे अनेक महत्त्वाचे हवाई मार्ग 26 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 00:30 वाजेपर्यंत (UTC) बंद राहतील. या बंदीमुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आणि अरबी समुद्रावरून उड्डाण करणाऱ्या विमानांवरही परिणाम होईल. सूत्रांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानने उचललेले हे पाऊल संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी किंवा हवाई संरक्षणाशी संबंधित सरावाचा भाग असू शकते.

भिवंडीत भाजपच्या पदाधिकाऱ्याची भावासह निर्घृण हत्या, पवारांच्या खासदारावर गंभीर आरोप, प्रकरण काय?

ऑपरेशन सिंदूर दरम्यानही निर्बंध

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान 23 एप्रिल रोजी पाकिस्तानने हवाई क्षेत्रावर निर्बंध लादले होते. भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील दहशतवादी संरचनांना लक्ष्य करण्यात आले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, ज्याला भारताने योग्य उत्तर दिले. दोन्ही देशांमधील संघर्ष 4 दिवस चालला, त्यानंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली. परंतु, पाकिस्तानने अद्याप त्यांच्या हवाई क्षेत्रावरील बंदी उठवलेली नाही. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, या निर्णयामुळे पाकिस्तानला दोन महिन्यांत सुमारे 4.10 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे नुकसान 24 एप्रिल ते 30 जून 2025 दरम्यान झाले.

 

Exit mobile version