Download App

India Canada Row : कॅनडाविरोधातील श्रीलंका भारतासाठी दंड थोपटून मैदानात

  • Written By: Last Updated:

कोलंबो : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeepsingh Nijjar) हत्येनंतर भारत आणि कॅनडा देशातील संबंध बिघडले असून, दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. एकीकडे जगभरातील काही देशांनी कॅनडाची बाजू घेत असताना आता भारताचा शेजारी श्रीलंका भारतासाठी दंड थोपटून कॅनडाविरोधात मैदानात उतरला आहे. कॅनडा-भारत वादाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी जस्टिन ट्रुडो यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो दहशतवाद्यांचे समर्थन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कॅनडा दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान असल्याचेही ते म्हणाले. ते एनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. (Sri Lanka Give Support To India In Canada Issue)

कॅनडाच्या विरोधात भारताला अनेक देशांचा पाठिंबा मिळाला आहे. आता या यादीत श्रीलंकेचेही नाव जोडले गेले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो दहशतवाद्यांचे समर्थन करतात. तसेच कॅनडा आणि उत्तर अमेरिका दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचेही साबरी यांनी म्हटले आहे. ट्रूडो यांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटत नाही. कारण ते अपमानास्पद आणि कोणत्याही पुराव्यांशिवाय खोटे आरोप नेहमीच करतात. श्रीलंकेबाबतही त्यांनी यापूर्वी असेच आरोप केले आहेत.

Manmohan Singh : पटेल यांचा एका नकार अन् देशाच्या राजकारणात झाली डॉ. मनमोहन सिंग यांची एन्ट्री…

ट्रुडो यांच्यामते श्रीलंकेत नरसंहार झाल्याचे मत आहे. मात्र, त्यांचे हे मत साफ चुकीचे आणि खोटे आहे. श्रीलंकेत एकही नरसंहार झालेला नाही. हे सर्वांना माहिती असल्याच साबरी यांनी यावेळी सांगितले. यावेळी साबरी यांनी कॅनडा आणि श्रीलंकेतील संबंध ट्रुडो यांच्या नरसंहारच्या टिपण्णीमुळे बिघडले. कॅनडाच्या पंतप्रधानांनी देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये असा सल्लाही दिला.

दहशतवादी करणवीर सिंग विरोधात इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस

बब्बर खालसा इंटरनॅशनल या खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य करणवीर सिंग (Karanveer Singh) याच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस (Interpol Red Corner Notice) जारी केली आहे. 38 वर्षीय करणवीर सिंग हा मूळचा पंजाबमधील कपूरथला येथील आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पाकिस्तानमध्ये उपस्थित असू शकतो. करणवीर सिंग हा बब्बर खालसा या दहशतवादी वाधवा सिंग आणि हरविंदर सिंग रिंडा यांचा उजवा हात असल्याचे सांगितले जाते. वाधवा आणि रिंडाही पाकिस्तानात लपून बसल्याचा संशय आहे.

Ajit Pawar : रोहित पवार, सुप्रिया सुळेंमुळेच अजितदादा शरद पवारांपासून लांब; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

त्याच्यावर भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI सोबत कट रचत असल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करणवीर सिंगवर खून, स्फोटक कायदा, दहशतवादी फंडिंग, शस्त्रास्त्र कायदा आणि दहशतवादी कट रचण्याचे गुन्हे दाखल आहेत.

Tags

follow us