India Maldives Tension : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (Maldives) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे शब्द वापरले. मालदीव सरकारनेही या प्रकाराची गंभीर दखल घेत टीका करणाऱ्या मंत्री शिउनासह आणखी दोन मंत्र्यांना (Ministers) निलंबित केले. मात्र तरीदेखील हा वाद शांतता झालेला नाही.
भारतीय नागरिकांनी आता मालदीवच्या पर्यटनाचे कंबरडे मोडण्याचे मनोमन ठरवल्याचे दिसत आहे. याचा खुलासा नुकताच झाला आहे. मागील तीन दिवसांच्या काळात मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत तब्बल 30 टक्के घट झाली आहे. ब्लू स्टार एअर ट्रॅव्हल सर्व्हिसेसचे निदेशक माधव ओझा यांनी याबाबत माहिती दिली.
India Maldives Tension : मालदीवमध्ये राजकीय भूकंप? विरोधकांच्या ‘अविश्वासा’च्या हालचाली
ओझा म्हणाले, की भारतातून मालदीवला जाणाऱ्या विमानांच्या उड्डाणात 20 ते 30 टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. मात्र हा वाद सुरू झाल्याने मालदीवाला मोठा फटका बसला आहे.
रोजचा विचार केला तर भारतातून मालदीवला रोज साधारण 7 ते 8 विमाने जात असतात. एकट्या मुंबई शहरातून रोज तीन विमाने मालदीवला जातात. मात्र आता यामध्ये घट होऊन रोजच्या उड्डाणांची संख्या 4 वर आली आहे. एका विमानातून साधारण 1200 ते 1300 प्रवासी जातात. आता मात्र लोकांनी आपली मालदीव टूर रद्द करण्याचा धडाका लावला. पीएम मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त भाषा कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असाच इशारा भारतीय नागरिकांनी यामाध्यमातून मालदीव सरकारला दिला आहे.
मालदीव बॅकफूटवर! बुकिंग पुन्हा सुरू करण्याची केली विनवणी..
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षयकुमार, अमिताभ बच्चन यांच्या वक्तव्यांनंतर मालदीवच्या बुकिंगमध्ये 20 टक्के घट दिसून आली आहे. आता लोक मालदीवचा विचार सोडून नव्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. ज्या लोकांना आपली मालदीवची यात्रा रद्द करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी थ्रिलोफिलीया कंपनीने खास घोषणा केली आहे. कंपनी तिकीट बुकिंगचे सगळे पैसे रिफंड करत आहे. कंपनीने स्पष्टपणे सांगितले की तिकीटांचे पैसे परत देण्याची सुविधा आगामी महिन्यांतील नियोजित यात्रांसाठी सुद्धा देण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले.