Download App

बांग्लादेशला दणका! भारतातून जाणारा व्यापारी मार्ग बंद; मोदी सरकारचा आदेश काय?

भारत सरकारने बांग्लादेशच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे.

India Bangladesh : भारत सरकारने बांग्लादेशच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय (India Bangladesh) घेतला आहे. या निर्णयामुळे बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे. थायलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि बांग्लादेशच्या पंतप्रधानांची नुकतीच भेट झाली होती. ही घडामोड ताजी असतानाच भारताने हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. खरंतर भारताने बांग्लादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद केली आहे. यामुळे बांग्लादेशचा भूतान, नेपाळ आणि म्यानमारबरोबरील व्यापार प्रभावित होऊ शकतो.

या सुविधेमुळे बंदरे आणि विमानतळाच्या रस्त्याने भारतीय भूमी सीमा शुल्क स्टेशन्सचा उपयोग करून बांग्लादेशातून अन्य देशांना निर्यात कार्गोची परवानगी देण्यात आली होती. सर्वात आधी भारतातील निर्यातदारांनी बांग्लादेशकडून ही सुविधा काढून घ्यावी अशी मागणी केंद्र सरकारला केली होती. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टमने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे.

भारत मार्गे बांग्लादेशची निर्यात

बोर्डाने आधीच्या म्हणजेच 29 जून 2020 रोजीच्या आदेशाला रद्द केले आहे. यामध्ये बांग्लादेशातून येणाऱ्या वस्तूंना भारत मार्गे दुसऱ्या देशांत पाठवण्याची परवानगी दिली होती. या वस्तू जमीन मार्गे भारतीय विमानतळे आणि बंदरामार्गे पोहोच होत होत्या. बांग्लादेश कोणत्याही अडचणीविना आपल्या वस्तू भूतान, नेपाळ आणि म्यानमारला निर्यात करू शकेल हा उद्देश यामागे होता.

Bangladesh Protests : मोठी बातमी! बांग्लादेशात स्थापन होणार अंतरिम सरकार, गुरुवारी शपथविधी

परंतु शेख हसीना (Sheikh Hasina) यांचं सरकार पडल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. याची सुरुवात सध्याच्या बांग्लादेश सरकारने केली आहे. भारताची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आता बांग्लादेश चीनकडे झुकू लागला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महानिदेशक अजय सहाय यांनी सांगितले की आता आमच्या कार्गोसाठी जास्त हवाई क्षमता असेल.

नव्या आदेशानंतर सुविधा बंद

एईपीसीचे अध्यक्ष सुधीर सेखरी यांनी सांगितले की जवळपास 20 ते 30 लोडेड ट्रक दररोज दिल्लीला येतात. यामुळे कार्गोची वाहतूक मंद होते. या परिस्थितीचा फायदा एअरलाइन्सकडून घेतला जातो. यामुळे हवाई वाहतुकीच्या भाडे दरात वाढ होत राहते. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे म्हणणे आहे की नव्या आदेशानंतर ही सुविधा तत्काळ बंद करण्यात आली आहे. जे सामान आधीच भारतात आले आहे त्यांना आधीच्या नियमानुसार बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल.

धक्कादायक! PM किसान योजनेत बांग्लादेशी लाभार्थी, भाजप नेत्याचा दावा; FIR दाखल

follow us