अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणावर उबर चालकाच्या हत्येचा आरोप; सीटबेल्टने गळा आवळून कारखाली चिरडले!

Indian-origin man Uber driver murder: अमेरिकेतील मिनेसोटा येथे एका भारतीय वंशाच्या तरुणावर उबर चालकाची हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

Indian-origin man Uber driver murder: अमेरिकेतील मिनेसोटा येथे एका भारतीय वंशाच्या तरुणावर उबर चालकाची हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

Indian-origin man Uber driver murder: अमेरिकेतील मिनेसोटा येथे एका भारतीय वंशाच्या तरुणावर उबर चालकाची हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

Indian-origin man Uber driver murder: अमेरिकेतील मिनेसोटा येथे एका भारतीय वंशाच्या तरुणावर उबर चालकाची हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. समीत अपूर्व पटेल (वय 25) असे आरोपीचे नाव असून, त्याने 51 वर्षीय सोमाली-अमेरिकन उबर चालक मोहम्मद युसूफ यांचा सीटबेल्टने गळा आवळून त्यांना त्यांच्याच कारखाली चिरडल्याचा आरोप आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युसूफ यांचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. यानंतर आरोपीविरोधातील हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा बदलून हेतुपुरस्सर (जाणीवपूर्वक) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष पेटणार, महाराष्ट्रावर अन्यायच होणार; राज ठाकरेंचा हल्लाबोल

14 नोव्हेंबर रोजी मिनियापोलिसमधील हॉपकिन्स उपनगरात ही घटना घडली होती. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, युसूफ हे आपल्या उबर चालक असलेल्या भावाशी फोनवर बोलत होते. त्याचवेळी त्यांनी एका प्रवाशाला कारमध्ये बसवले. प्रवाशाने त्यांचे नाव विचारले. युसूफ यांनी मोहम्मद असे नाव सांगितल्यानंतर आरोपीने या नावाबद्दल नाराजी व्यक्त केल्याचा आरोप आहे.

यानंतर युसूफ यांच्या भावाला फोनवर त्यांचा आरडाओरडा ऐकू आला. आरोपी सीटबेल्टने आपला गळा आवळत असून आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते सोमाली भाषेत सांगत होते. तसेच आरोपी आपल्याला कारखाली चिरडत असल्याचेही त्यांनी भावाला सांगितले.

होकायंत्र दिशा दाखवते, पण हे धोकायंत्र, शरद पवारांवर राज ठाकरेंची खोचक टीका

युसूफ यांच्या स्मार्टवॉचच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. ते रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांच्या बरगड्या आणि पाय मोडले होते. तसेच मणक्याला दुखापत, फुफ्फुसांमध्ये हवा साचणे आणि अंतर्गत रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावर पाचहून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, शनिवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

8 लाख डॉलरचा जामीन भरून आरोपीची सुटका

या प्रकरणात समीत पटेल याला अटक करण्यात आली होती. सुरुवातीला त्याच्यावर सेकंड डिग्री हत्येचा प्रयत्न आणि कारजॅकिंगचे आरोप ठेवण्यात आले होते. न्यायालयाने 8 लाख डॉलरचा जामीन मंजूर केला. त्यानंतर कुटुंबीयांनी जामिनाची रक्कम भरल्याने त्याची तुरुंगातून सुटका झाली. सुटकेनंतर त्याला इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंगवर ठेवण्यात आले असून, मद्य आणि अमली पदार्थांच्या सेवनावरही बंदी घालण्यात आली आहे. त्याची पुढील सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे.

तुम्ही मला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर बनवलं, निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचा सुपरस्टारच्या मुलाबद्दल धक्कादायक खुलासा

दरम्यान, आरोपीचे वकील कॅथरीन टर्नर यांनी युसूफ यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच प्रकरणाचा तपास सुरू असल्याने लोकांनी घाईघाईने निष्कर्ष काढू नयेत, असे आवाहन केले आहे.

वांशिक द्वेषातून हल्ला झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

युसूफ यांचे नाव समजल्यानंतर आरोपीने नाराजी व्यक्त केल्याच्या कथित प्रकारामुळे या हल्ल्यामागे सोमाली समुदायाविषयीचा वांशिक द्वेष होता का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. युसूफ यांच्या कुटुंबीयांनीही हा हल्ला वांशिक द्वेषातून झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, सध्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारे हल्ल्यामागे वांशिक द्वेष असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत.

Exit mobile version