US birthright citizenship : ट्रम्प यांचा आदेश लागू होण्यापूर्वी भारतीयांच्या मुलं जन्माला घालण्यासाठी रांगा

US birthright citizenship :  ट्रम्प यांचा आदेश लागू होण्यापूर्वी भारतीयांच्या मुलं जन्माला घालण्यासाठी रांगा

US birthright citizenship Indian Rush C Section Deadline Maternity : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ‘बर्थ राइट सिटीझनशिप पॉलिसी'(US birthright citizenship) मधील बदलांमुळे, अमेरिकेतील स्थलांतरित कुटुंबे, विशेषत: भारतीय गर्भवती महिला सी-सेक्शनद्वारे वेळेपूर्वी जन्म देत आहेत. जन्महक्क बंदीची अंतिम मुदत ओलांडण्यासाठी अमेरिकेत बाळंतपणासाठी गर्दी होतेय. भारतीय जोडपी 20 फेब्रुवारीपूर्वी डॉक्टरांना फोन करत आहेत. सिझेरियनसाठी (C Section) दवाखान्यांमध्ये रांगेत उभे आहेत. एका भारतीय वंशाच्या स्त्रीरोगतज्ज्ञाने सांगितले की, त्यांना अशा सुमारे 20 जोडप्यांचे फोन आलेत.

आपल्या मुलांना जन्मजात अमेरिकन नागरिकत्व मिळावं, म्हणून ट्रम्प यांचा अध्यादेश लागू होण्यापूर्वी घाईघाईने सिझरियन करून मुलं जन्माला घालण्यासाठी तिथले भारतीय डॉक्टरांकडे रांगा लावायला लागलेत. गर्भाची पूर्ण वाढ होण्याआधी असं काही करणं बाळाला आणि आईला अपायकारक आहे हा भाग तर आहेच, पण भारतीय नागरिकत्वाचा इतका तिटकारा या एन आर आय मंडळींना का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतात अमृतकाळ आला आहे असं हीच लोकं गेली दहा वर्षं आपल्याला सांगतायत, अशी सोशल मीडिया पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

अबब! महाकुभांत नाशकातील व्यक्तीने विक्रीस ठेवला 6 लाखांचा शंख…

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानुसार जन्महक्क नागरिकत्व रद्द करण्याची ही अंतिम मुदत आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशांपैकी एक म्हणजे अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द (Birth Visas) करणे. त्यामुळे १९ फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेत जन्मलेली मुले अमेरिकन नागरिक म्हणून जन्माला येतील.19 फेब्रुवारीनंतर, स्थलांतरित लोकांची जन्मलेली मुले नैसर्गिक अमेरिकन नागरिक राहणार नाहीत.

अमेरिकेत तात्पुरत्या H-1B आणि L1 व्हिसावर हजारो भारतीय काम करत आहेत. ते ग्रीन कार्डसाठी देखील रांगेत आहेत, जे अमेरिकेत कायमस्वरूपी निवासस्थान देतात. ज्या पालकांपैकी कोणीही अमेरिकन नागरिक किंवा ग्रीन कार्ड धारक नाही. अशा पालकांना जन्मलेली मुले जन्मतः अमेरिकन नागरिक राहणार नाहीत. म्हणूनच 20 फेब्रुवारीपूर्वी सी-सेक्शनद्वारे बाळांना जन्म देण्याची घाई होत आहे.

Joint Home Loan : जॉइंट होम लोन घेणे किती योग्य? जाणून घ्या, फायद्याचं गणित

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, न्यू जर्सी येथील डॉ. एस. डी. रामा यांच्या प्रसूती क्लिनिकमध्ये आता आठव्या आणि नवव्या महिन्यांच्या गरोदर महिलांकडून सी-सेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहेत. अनेक महिलांचा प्रसुती काळ पूर्ण होण्यास काही महिने शिल्लक आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय गरोदर महिलांना ‘जन्म हक्क नागरिकत्व धोरणा’मुळे सी-सेक्शनद्वारे आपल्या मुलाला मुदतीपूर्वी जन्म द्यायचा आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, भारतीय पालक 20 फेब्रुवारीपूर्वीच सी-सेक्शनचा पर्याय निवडत आहेत. याद्वारे त्यांना प्रीमॅच्युअर बाळाला जन्म द्यायचा आहे.

ट्रम्प सरकारचे जन्म हक्क नागरिकत्व धोरण 20 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. अमेरिकेत राहणाऱ्या कायदेशीर कागदपत्रे असलेल्या किंवा तात्पुरत्या स्थलांतरितांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही, असा ट्रम्प सरकारचा स्पष्ट आदेश आहे. मात्र, ट्रम्प सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube