VIDEO : दुबई एअर शोमध्ये मोठा विमान अपघात: उड्डाणावेळी लढाऊ तेजस विमान कोसळले

tejas aircraft : दुबईमध्ये एअर शो दजरम्यान मोठा विमान अपघात झाला आहे. भारताचे तेजस लष्करी विमान उड्डाणावेळी कोसळले आहे.

Indian Tejas Aircraft Crashes At Dubai Air Show

Indian Tejas Aircraft Crashes At Dubai Air Show

indian tejas aircraft crashes at dubai air show: दुबईमध्ये एअर शो दजरम्यान मोठा विमान अपघात झाला आहे. भारताचे तेजस लष्करी विमान उड्डाणावेळी कोसळले आहे. यात पायलटचा मृत्यू झालाय. तर एअर शो थांबविण्यात आला आहे.

दुबईमध्ये शुक्रवारी एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. या एअर शोमध्ये भारताचे तेजस लढाऊ विमान सहभागी झाले होते. हवाई प्रदर्शनासाठी विमानाने उड्डाण घेतले. त्यानंतर काहीच वेळात हे विमान जमिनीवर कोसळले आहे. दुपारी दोन वाजून दहा मिनिटाने ही दुर्घटना घडली आहे. या विमानाची निर्मिती एचएएल कंपनीने केलेली आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या व्यक्तींपासून दूर हे विमान पडले आहे.दरम्यान या दुर्घटनेनंतर दुबई एअर शो रद्द करण्यात आला आहे.

पायलटचा मृत्यू
तेजस फायटर जेट विमान कोसळले आहे. यात पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती एअर फोर्सकडून देण्यात आलेली आहे. फायटर जेट तेजस सिंगल-सीट लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) विकसित केले आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी न्यायालय स्थापन केले जाणार असल्याचे एअर फोर्सने एक्सवरून जाहीर केलंय.

ockquote class=”twitter-tweet”>

🚨🚨A Tejas fighter jet 🛩️has crashed during a display at Dubai air show. No information on pilot.

Sad day for Indian military aviation sector. More details awaited. #Tejas #DubaiAirShow pic.twitter.com/rCBQtdoXIy

— EurAsian Times (@THEEURASIATIMES) November 21, 2025

Exit mobile version