Download App

राहुल गांधींच्या आरोपांवर उद्योगपती गौतम अदानींचे उत्तर

  • Written By: Last Updated:

नवी दिल्लीः देशातील क्रमांक एकचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निशाणावर कायमच असतात. भारत जोडो यात्रेतही राहुल गांधी यांनी केंद्र सरकार, उद्योगपती अदानींवर टीका केली आहे. त्याला आता अदानी यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले आहे.

गेल्या आठ वर्षांपासून राहुल गांधी हे तुमच्यावर टीका करत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना अदानी म्हणाले, २०१४ पासून राहुल गांधी हे माझ्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे लोक अदानी यांनी ओळखत आहे. त्यामुळे माझी प्रसिध्द वाढली असल्याचे अदानी यांनी हसत सांगितले. पण पुढे बोलताना अदानी म्हणाले, राहुल गांधी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यांनाही देशाचा विकास हवा आहे. मी उद्योगपती म्हणून त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत. ते माझ्यावर केवळ राजकीय आवेशातून टीका करतात.

नरेंद्र मोदी आणि ते एकाच राज्यातून येतात. त्यामुळे गुजरातमध्ये गुंतवणूक करतात, अशी टीका होते. त्यावर अदानी म्हणाले, माझ्यावर चुकीचे आरोप लावले जात आहेत. मी देशातील २२ राज्यांमध्ये उद्योगासाठी गुंतवणूक केली आहे. अनेक राज्यात भाजपचे सरकार नाही. बंदरे, विमानतळे, गॅस, खाण उद्योगामध्ये सरकारच्या निविदाप्रमाणेच काम मिळालेले आहे. एकही काम निविदाशिवाय मिळालेले नाही.

अदानींना एेवढे कर्ज का मिळते, यावर अदानी म्हणाले, मला पूर्वी भारतीय बँकेकडून कर्ज मिळत होते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्ज मिळत आहे. माझ्यावर कर्ज वाढले असले तर २४ टक्कांनी उत्पन्न वाढले आहे. माझ्यावरील कर्जापेक्षा तीन ते चारपटींने उत्पन्न जास्त आहे. भारताचा विकास होईल, त्यापर्यंत माझा विकास होत राहील असे अदानी यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us