ब्रिटनमध्ये खळबळ! एपस्टाईन प्रकरणात ब्रिटनच्या किंग चार्ल्स-III यांच्या धाकट्या भावाला अटक
एपस्टाईन प्रकरणात अँड्र्यू यांचे नाव समोर आल्यानंतर जगातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
British King Charles Younger Brother Andrew Mountbatten Arrested After Name Appeared In Epstein Files : ब्रिटनचे किंग चार्ल्स-III यांचे धाकटे बंधू आणि माजी प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन यांना अटक करण्यात आली आहे. अलिकडेच अमेरिकेतील एपस्टाईन फाइल्समध्ये त्यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. 66 वा वाढदिवस साजरा करताना अँड्र्यू यांना पोलिसांनी अटक केली आहे. अँड्र्यू माउंटबॅटन यांना सँडरिंगहॅम इस्टेट येथे ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी एपस्टाईनला सरकारी कागदपत्रे पुरवल्याचा संशय आहे. थेम्स व्हॅली या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. एपस्टाईन प्रकरणात अँड्र्यू यांचे नाव समोर आल्यानंतर जगातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी पूर्व इंग्लंडमधील सँडरिंगहॅम इस्टेटवरील वुड फार्म येथे ब्रिटिश विशेष पोलिसांनी अँड्र्यू यांना अटक केली. त्यांना अटक करण्यासाठी आठ साध्या वेशातील अधिकारी आले.
Statement from King Charles III of the United Kingdom | "I have learned with the deepest concern the news about Andrew Mountbatten-Windsor and suspicion of misconduct in public office. What now follows is the full, fair and proper process by which this issue is investigated in… https://t.co/FbbqEERQ0k pic.twitter.com/eTVImaVqi1
— ANI (@ANI) February 19, 2026
अँड्र्यू माउंटबॅटन कोण आहे?
66 वर्षीय अँड्र्यू हे दिवंगत क्विन एलिजाबेथ-II आणि प्रिन्स फिलिप यांचे तिसरे अपत्य आहेत. ते सध्या ब्रिटिश सिंहासनाच्या उत्तराधिकारींच्या रांगेत आठव्या क्रमांकावर असून, इंग्लंडचे राजा चार्ल्स-III आणि राजकुमारी अँ यांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांचे लग्न सारा फर्ग्युसनशी झाले आहे, जी नंतर यॉर्कची डचेस बनल्या होत्या, मात्र, घटस्फोटानंतर त्यांना ही पदवी सोडावी लागली. अँड्र्यू आणि सारा यांना राजकुमारी बीट्रिस आणि राजकुमारी युजेनी या दोन मुली आहेत. अँड्र्यू यांनी रॉयल नेव्हीमध्ये 22 वर्षे काम केले असून, त्यांनी 1982 च्या फॉकलंड युद्धादरम्यान हेलिकॉप्टर पायलट म्हणून काम केले. 2001 मध्ये ते कमांडर पदावरुन सक्रिय सेवेतून निवृत्त झाले. नंतर त्यांना 2010 मध्ये रिअर अॅडमिरल आणि 2015 मध्ये व्हाइस अॅडमिरल म्हणून बढती देण्यात आली. नौदल सेवेव्यतिरिक्त, अँड्र्यू यांनी राजनैतिक भूमिका बजावल्या आहेत. यूके सरकारने त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूकीसाठी विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले होते. 2011 ते 2019 दरम्यान, त्यांनी राजघराण्याचे सदस्य म्हणून काम केले, राजाच्यावतीने त्यांनी विविध उपक्रमांमध्येही भाग घेतला आहे.
अँड्र्यूयांच्यावर कोणते आरोप आहेत?
एपस्टाईन सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर अँड्र्यूने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत दाखल झालेल्या एका नागरी लैंगिक शोषण प्रकरणात त्यांचे नाव आल्यानंतर ते वादात सापडले. एवढेच नव्हे तर, न्यायालयीन कागदपत्रांमध्ये व्हर्जिनिया गिफ्रे नावाच्या एका तरुणीने दावा केला की, ती लैंगिक तस्करीची बळी ठरली असून, एपस्टाईनने 16 वर्षांच्या वयापासून तिचे शोषण केल्याचा आरोपही या तरूणीने केला आहे. तसेच जेफ्रीने तिची प्रिन्स अँड्र्यूसह अनेक प्रभावशाली लोकांशी ओळख करून दिल्याचाही आरोप आहे. मात्र, तरूणीकडून करण्यात आलेले सर्व आरोप अँड्र्यू यांनी वर्षानुवर्षे नाकारले असून, संबधित तरूणीला ते कधीही भेटले नसल्याचा दावा केला होता. परंतु, 2011 मध्ये दोघांचा एकत्र उभे असलेला फोटो सार्वजनिकरित्या प्रसिद्ध झाला होता.
