King Charles III : ब्रिटेनचे किंग चार्ल्स यांना कॅन्सरचे निदान; बकिंगहॅम पॅलेसने दिली माहिती

King Charles III : ब्रिटेनचे किंग चार्ल्स यांना कॅन्सरचे निदान; बकिंगहॅम पॅलेसने दिली माहिती

King Charles III Cancer : ब्रिटनच्या राजघराण्याचे किंग चार्ल्स तृतीय यांच्या (King Charles) प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट ग्रंथींबाबत तक्रार होती. नंतर त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीचे अहवाल मिळाले असून किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे (Cancer) निदान झाले आहे. परंतु, हा कर्करोग प्रोटेस्ट ग्रंथींशी संबंधित नाही असे स्पष्ट करण्यात आले. कॅन्सर झाला आहे मात्र तो शरीराच्या कोणत्या भागात आहे हे अद्याप स्पष्ट नाही. यानंतर किंग चार्ल्स यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

किंग चार्ल्स यांच्या उपचारांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणचे उपक्रम टाळण्याचा सल्ला दिला आहे. बकिंगहम पॅलेसने (Buckingham Palace) सांगितले की चार्ल्स त्यांची दैनंदिन कामे नेहमीप्रमाणेच सुरू ठेवणार आहेत. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. लवकरच ते राजकीय कामकाजही सुरू करतील. सध्या अन्य कार्यक्रम टाळले जातील. त्यांच्या जागी राजघराण्यातील अन्य ज्येष्ठ सदस्य कामकाज पाहतील.

King Charles III Coronation: शंभर वर्षे जुने सिंहासन, सोन्याचे कपडे, बंदुकीची सलामी, 2500 कोटींचा खर्च; असा असेल राजा चार्ल्सचा राज्याभिषेक

या आजारपणातून ते कधी बरे होतील याची माहिती अद्याप नाही. किंग चार्ल्स तृतीय 75 वर्षांचे आहेत. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलेले नाही. त्यांच्यावर आऊटडोअर पेशंट म्हणून उपचार केले जात आहेत. या उपचारानंतर ते लवकरच बरे होऊन पुन्हा कामकाज सुरू करतील अशी माहिती बकिंगहम पॅलेसने दिली.

दरम्यान, ब्रिटनमध्ये राज्याभिषेकाची परंपरा 900 वर्षांपासून सुरू आहे. राजा चार्ल्स तिसरा ब्रिटनचा 40 वे सम्राट बनले. त्यांच्या राज्याभिषेकासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून पाहुणे उपस्थित होते. राज्याभिषेकावर सुमारे 2500 कोटींचा खर्च झाला. राजा चार्ल्स III च्या कपड्यांपासून ते सोनेरी गाडीपर्यंत आणि राज्याभिषेकाच्या सिंहासनापासून राजाच्या मुकुटापर्यंत सर्व काही खूप महत्वाचे होते.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे 2022 मध्ये निधन झाले. त्यांच्यानंतर या सिंहासनावर आरुढ होण्याचा मान किंग चार्ल्स तृतीय यांना मिळाला. लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांना ब्रिटनचे सम्राट घोषित करण्यात आले.

ब्रिटनच्या किंग चार्ल्स III चा राज्याभिषेक: हजारो कोटींचा खर्च, पाहा फोटो

follow us
  • fb
  • instagram
  • youtube