डोनाल्ड ट्रम्पने अश्लील पत्र लिहिलं? कुणाला आणि कधी…डेमोक्रॅट्सने केला धक्कादायक गौप्यस्फोट

Donald Trump Obscene Letter

Donald Trump Obscene Letter To Jeffrey Epstein Democrats Allegations : अमेरिकन कॉंग्रेसच्या हाऊस ओव्हरसाईट कमिटीतील डेमोक्रॅट्सनी सोमवारी एक धक्कादायक पत्र जाहीर केलंय. हे पत्र माजी वित्तीय गुंतवणूकदार जेफ्री एपस्टीन याला लिहिल्याचा दावा केला गेलाय. त्यावर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सही असल्याचं म्हटलं जातंय. डेमोक्रॅट्सच्या मते हे पत्र ‘यौन संकेत’ असलेले आहे. मात्र ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

काय आहे पत्रामागची कहाणी?

हे पत्र 2003 मध्ये एपस्टीनच्या 50व्या वाढदिवसानिमित्त तयार केलेल्या (Jeffrey Epstein) खास अल्बममध्ये सापडले असल्याचे सांगितले जाते. एपस्टीन (America) हा एक श्रीमंत आणि प्रभावशाली फाइनान्सर होता, ज्याचं नाव अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण व तस्करीप्रकरणी चर्चेत (Democrats Allegations) आलं होतं. 2019 मध्ये न्यूयॉर्कमधील तुरुंगात त्याने आत्महत्या केली, तेव्हा तो न्यायालयीन सुनावणीची प्रतीक्षा करत (Donald Trump) होता.

ट्रम्पचा स्पष्ट नकार

या वादावर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हे पत्र मी लिहिलेलं नाही. त्या चित्रांशीही माझा काही संबंध नाही. ही माझी भाषा नाही. मी असे चित्र काढत नाही. यासोबतच त्यांनी या बाबत प्रथम रिपोर्ट प्रकाशित करणाऱ्या वॉल स्ट्रीट जर्नलविरुद्ध तब्बल 10 अब्ज डॉलर्सचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

व्हाईट हाऊसची अधिकृत भूमिका

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलीन लेविट यांनी ‘एक्स’ (पूर्वीचा ट्विटर) वर लिहिले, पूर्वीप्रमाणेच आम्ही पुन्हा स्पष्ट करतो की हे पत्र किंवा चित्र ट्रम्प यांचे नाही. त्यांच्या कायदेशीर टीमकडून या प्रकरणावर आक्रमक पावलं उचलली जातील. याचबरोबर डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ टेलर बुडोविच यांनी ट्रम्प यांच्या जुन्या अधिकृत सह्यांचे फोटो पोस्ट करून दाखवले की, जाहीर झालेलं पत्र त्यांचं नसल्याचं स्पष्ट दिसतं.

एपस्टीन-ट्रम्प नात्यावर नव्याने प्रश्न

या खुलास्यामुळे पुन्हा एकदा ट्रम्प आणि एपस्टीनच्या जुन्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ट्रम्प यांनी याबाबत सांगितलं की त्यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी एपस्टीनपासून संबंध तोडले होते. कारण एपस्टीनने त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या काही मुलींना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये वर्जिनिया ग्यूफ्रेचाही समावेश होता, जिने एपस्टीनवर लैंगिक तस्करीसारखे गंभीर आरोप लावले होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube