America : जो बायडन मोठ्या वादात; डोळे विस्फारणारी रक्कम लाच म्हणून स्विकारल्याचा आरोप

America : जो बायडन मोठ्या वादात; डोळे विस्फारणारी रक्कम लाच म्हणून स्विकारल्याचा आरोप

US President Joe Biden accused of corruption :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सध्या मोठ्या वादात सापडले आहेत. त्यांच्यावर सर्वात मोठ्या लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे. जो बायडन यांच्यावर युक्रेनमधील एका कंपनीकडून 5 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 41 कोटी 22 लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप आहे. फॉक्स न्यूजच्या अहवालानुसार, बायडन यांना युक्रेनियन गॅस कंपनी बुरिस्मा होल्डिंग्जच्या अधिकाऱ्याकडून 5 दशलक्ष डॉलर मिळाले. याच कंपनीत बायडन यांचे सुपुत्र हंटर बायडन बोर्ड सदस्य म्हणून प्रदीर्घ काळ कार्यरत होते.

Nawazuddin Siddiqui : ट्रान्सजेंडरच्या लुकमध्ये स्वतःला पाहिल्यानंतर नवाजुद्दीनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…  

या अहवालानुसार, याच गॅस कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्याविरोधात चौकशी सुरु होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करणार्‍या संबंधित कार्यकारी अधिकाऱ्याने बायडन यांच्याकडे मदत मागितली. भ्रष्टाचाराची ही चौकशी बंद करण्यासाठी बायडन यांना 5 मिलियन डॉलरची लाच देण्यात आली असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

WTC Final 2023: शुभमन गिल नॉट आऊट होता का? अंपायरवर टीम इंडियासोबत फसवणूक केल्याचा आरोप…

एफबीआयला जून 2020 मध्ये एका गोपनीय स्त्रोताकडून याची माहिती मिळाली होती. अहवालानुसार, एफबीआयच्या दस्तऐवजात युक्रेनियन वकिलाला काढून टाकणे आणि चौकशी थांबविणे यासाठी जो बायडन यांना 5 दशलक्ष डॉलर्स कसे दिले गेले याची सर्व माहिती देण्यात आली आहे. युक्रेनियन तेल कंपनी बुरिस्मा होल्डिंग्जच्या मालकाकडून हे पैसे कथितपणे आले आहेत.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या व्यतिरिक्त, त्यांचा मुलगा हंटर बाइडन यांना देखील युक्रेनियन गॅस कंपनीला भ्रष्टाचाराच्या चौकशीपासून वाचवण्यासाठी $ 5 दशलक्ष मिळाले होते, असा आरोप रिपब्लिकन खासदारांनी आरोप केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube