चीनच्या ‘पॉकेट अटॅक’ने अमेरिकेत खळबळ; आपल्याच नागरिकांवर निर्बंधांची नामुष्की..

अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणेने आपल्या कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी फोनचा वापर कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

Cyber Attack

Cyber Attack

China Cyber Attack on America : चीनच्या पॉकेट अटॅकमुळे अमेरिकेत चांगलीच खळबळ उडाली आहे. येथील परिस्थिती अशी झाली आहे की फेडरल एजन्सीजना आपल्याच देशातील लोकांवर निर्बंध आणावे लागत आहेत. अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणेने आपल्या कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी फोनचा वापर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. असे आदेश जारी करण्यामागे चीन प्रमुख कारण आहे. अमेरिकेच्या टेली कम्युनिकेशन इंफ्रास्ट्रक्चरला चीनकडून टार्गेट करण्यात आले होते.

कर्मचाऱ्यांना गुरुवारी एक ई मेल पाठवण्यात आला होता. यामध्ये वित्तीय सुरक्षा ब्युरोच्या मु्ख्य माहिती अधिकाऱ्यांनी इशारा दिला की अंतर्गत आणि बाहेरील कामकाजाशी संबंधित बैठका आणि चर्चा फक्त Microsoft Teams आणि Cisco WebEx सारख्या प्लॅटफॉर्म्सवर केल्या पाहिजेत. अशा महत्वाच्या कामकाजासाठी मोबाइल फोन्सचा वापर करू नका अशा सूचना या मेलद्वारे कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Russia China : चीन-रशियाकडून डॉलर हद्दपार! द्विपक्षीय व्यापारासाठी तयार केला खास प्लॅन

Exit mobile version