Download App

इम्रान खानला दणका! समर्थक 120 अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई; कारणही आले समोर

Pakistan News : सतत अशांत आणि धुमसणाऱ्या पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी मोठी कारवाई केली आहे. 9 मे रोजी पाकिस्ताच्या लष्करी छावण्यांवर हल्ला करत तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या लोकांवर कारवाई न करणाऱ्या 120 लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. लष्करी छावण्यांवर हल्ला करणारे लोक हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक होते. कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांत पाकिस्तानी सैन्यातील मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांचे मागील एक महिन्यापासून कोर्ट मार्शल सुरू होते.

चीनमध्ये फक्त दोनच तास फोन वापरण्याची परवानगी? कायदाच पारित होणार…

पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी ही जी कारवाई केली आहे. त्यामागे दोन कारणे सांगितली जात आहेत. पहिले कारण म्हणजे, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या संमतीनेच मुनीर यांना लष्करप्रमुखपदी नियुक्त केले गेले आहे. ब्रिटनमध्ये असलेल्या शरीफ यांना परत आणण्यासाठी इम्रान समर्थक अधिकाऱ्यांना सैन्यातून काढून टाकण्यात आले आहे. या कारवाईने विरोधकांना कठोर संदेश देण्याचा उद्देश आहे.

पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी 2019 मध्य मुनीर यांना आयएसआय चीफ पदावरून हटवत फैज हमीद यांची नियुक्ती केली होती. 2021 मध्ये हमीद यांना पुन्हा मुदतवाढ देऊ केली असता तत्कालीन लष्करप्रमुख जावेद बाजवा यांनी नकार दिला होता. बडतर्फ अधिकाऱ्यांपैकी एक ब्रिगेडियर, दोन लेफ्टनंट कर्नल आणि चार मेजर रँकच्या अधिकाऱ्यांची पेन्शनही संपविण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आदेशात सात अधिकाऱ्यांची पेन्शन संपविण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. पण, इतर अधिकाऱ्यांची पेन्शन सुरू ठेवण्याचा किंवा संपविण्याचा उल्लेख नाही. हे सातही अधिकारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जातात.

India-Pakistan peace! बिथरलेला पाकिस्तान नरमला; भारताकडे केली चर्चेची मागणी

दरम्यान,  पाकिस्तानसमोर सध्या अनेक अडचणी आहेत. देशातील बेरोजगारी, महागाई, गरीबी या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्थाही ढासळली आहे. देश चालविण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागत आहे. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आणखी कर्ज घ्यावे लागत आहे.  अशा परिस्थितीत पाकिस्तानची सध्याची वाटचाल सुरू आहे.

Tags

follow us