Canada Forest Fire : कॅनडाच्या जंगलात आतापर्यंतचा सर्वात मोठा वणवा (Canada Forest Fire) पेटला आहे. या परिसरातील सर्वच शहरांत या वणव्याचा परिणाम दिसून येत आहे. आता तर असे सांगितले जात आहे की ऑगस्टपर्यंत परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 33 हजार चौरस किलोमीटर परिसरात आगीने थैमान घातले आहे. हा परिसर बेल्जियम देशाच्या एकूण क्षेत्रफळापेक्षाही मोठा आहे. या आगीमुळे तब्बल 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त लोकांनी आपले घर सोडले आहे.
कॅनडातील 413 जंगलांमध्ये ही आग लागली आहे. या आगीचा धूर कॅनडाच नाही तर अमेरिकेच्याही काही राज्यात पसरला आहे. न्यूयॉर्क, मिनेसोटा, क्वीन्स आणि मॅसाच्यूसेट्स या राज्यात एअर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Viral video : मद्यधुंद महिला प्रवाशाचं विमानात थैमान; बाहेर काढताना पोलिसाचा चावा घेत लाथही मारली
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युजीलँड आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांचे फायर फायटर्स येथे हजर आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो म्हणाले, सध्या परिस्थिती भयावह आहे. अनेक लोकांना आपले घर सोडणे भाग पडले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याआधी कॅनडातील नोवा स्कोटिया प्रांतातील वणव्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. या ठिकाणी दोनशे घरे जळून खाक झाली. 16 हजार लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावे लागले.
देशात पुरानंतर जंगलातील वणवे ही एक मोठी समस्या मानली जाते. या आगीमुळे दरवर्षी लाखो हेक्टर क्षेत्र जळून खाक होते. जंगलात ऑक्सिजन हवेत उपलब्ध असतो. झाडांच्या फांद्या आणि पाने इंधनाचे काम करतात. त्यानंतर पडलेली एक लहानशी ठिणगी होत्याचं नव्हतं करून टाकते. आगीच्या घटना या उन्हाळ्यात घडतात. या दिवसात लहानशा ठिणगीने संपूर्ण जंगालात आग भडकते. झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून किंवा सूर्याच्या प्रखर किरणांमुळेही अनेकदा वणवा पेटण्याच्या घटना घडतात.
‘भारतात जिवंत लोकशाही, शंका असेल तर स्वत: जाऊन पाहा : अमेरिकेकडून मोदी सरकारचं कौतुक
उन्हाळ्यात झाडाच्या फांद्या वाळतात. ज्यामुळे आग लागण्यास फार वेळ लागत नाही. हवेमुळे ही आग जंगलात पसरायलाही फार वेळ लागत नाही. या व्यतिरिक्त वीज पडणे, ज्वालामुखी आणि कोळशाच्या ज्वलनातूनही जंगलांना आग लागू शकते. आता मात्र तापमानात वाढ झाल्याने कॅनडातील जंगलांना आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.