Download App

साखर कारखान्यांची, बँकांची काय परिस्थिती, माहिती घ्या; जामखेडच्या कार्यक्रमातून अजितदादांनी नगरच्या नेत्यांना घेरले !

अजित पवार म्हणाले, साखर कारखान्यांचे गाळप शंभर दिवसावर आले आहेत. काही कारखाने साडेतीन हजार भाव देत आहे. काही कारखाने अडीच हजार भाव देत आहेत.

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar on Rohit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे गुरुवारी जामखेड दौऱ्यावर होते. शाहू-फुले-आंबेडकर महोत्सवामध्ये त्यांनी जोरदार भाषण केले. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह नगरमधील कारखानदार नेत्यांवरही त्यांनी टीका केली. नगर जिल्ह्यातील साखर कारखाने चालले असते ती मी कशाला अंबालिका कारखाना सुरू केला असता. आज नगरमधील साखर कारखान्यांची काय अवस्था आहे. मी नाव घेत नाही. पण काही साखर कारखान्यांची माहिती घ्या, असा सल्लाही अजित पवार यांनी भाषणातून दिला.

मंगेशकर रुग्णालयबाबत ससूनचा आश्चर्यकारक अहवाल! डॉक्टर सुश्रुत घैसास दोषी नाहीच?

नगरमधील साखर कारखान्यांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, साखर कारखान्यांचे गाळप शंभर दिवसावर आले आहेत. काही कारखाने साडेतीन हजार भाव देत आहे. काही कारखाने अडीच हजार भाव देत आहेत. काही कारखाने दोन-तीन महिने भाव देतात. शेवटचे दोन महिने भावच देतच नाही. अंबालिका कारखान्याला ऊस घालायला रोग आला होता का ? अंबालिका कारखान्याला ऊस घातला असता मी भाव देतो. मी माझा माणसाला फसवत नाही.

साखर कारखान्यांची, बँकांची काय परिस्थिती, माहिती घ्या; जामखेडच्या कार्यक्रमातून अजितदादांनी नगरच्या नेत्यांना घेरले !

आज काय नगरमधील कारखान्यांची अवस्था आहे. मी नावे घेत नाही. लगेच मला फोन येतील दादा जामखेडच्या भाषणात आमचे कशाला काढले हो. तू उद्योग केले म्हणून काढले हो. आज त्यांचे कारखाने चालले असते तर मी कशाला कारखाना काढला असता. आज काही जिल्हा बँकेची बारकाईने माहिती घ्या. काही कारखान्यांची माहिती घ्या.

काही संस्था, मार्केट कमिट्या, खरेदी विक्री संघाची माहिती. बारामती अशी तशी झाली नाही. मी रोज सकाळी सहा वाजता कामाला लागतो. निम्मी अर्धी बारामती झोपत असताना मी काम करतो. दिवसभर काम करतो. तेव्हा तेथे बारामती झाली. त्यांच्यामध्ये अनेक जण राबले आहेत. तुमच्या भागात शिक्षणाचे काम झाले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

एमआयडीसी आली का? अजितदादांना रोहित पवारांना टोला

कंत्राटदार बदलेले आहे. एसटीचे प्रश्न सुटले नाहीत. बरेच येथे प्रश्न आहेत. रोहित आमच्याबरोबर होता, तेव्हा किती कोटींचा निधी दिला, याची माहिती काढा. आता तो माझ्याबरोबर नाही. प्रा. राम शिंदे यांना भाजपने सभापती केले आहे. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कर्जत-जामखेडला एमआयडीसी आणावी लागणार आहे. बरेच जणांनी सांगितले एमआयडीसी येणार म्हणून, पण एमआयडीसी आली का ? प्रयत्न करावा लागणार आहे. वेळ द्यावा लागणार आहे.

follow us