मोठी बातमी! निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले पुण्यात दाखल, केला धक्कादायक खुलासा

Ranjit Kasle : बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले काहीवेळा पूर्वी पुण्यात दाखल झाले असून पुणे पोलिसांना शरण जाणार आहे.

Ranjit Kasle

Ranjit Kasle

Ranjit Kasle : बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) काही वेळापूर्वी पुण्यात दाखल झाले असून पुणे पोलिसांना शरण जाणार आहे. काही वेळीपूर्वी रणजीत कासले पुणे (Pune) विमानतळावर दाखल झाले असून यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुणे पोलिसांना शरण जाणार असल्याची माहिती दिली तसेच त्यांनी यावेळी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

तसेच ईव्हीएम मशीनपासून दुर जाण्यासाठी माझ्या अकाऊंटमध्ये 10 लाख रुपये पाठवण्यात आले होते असा धक्कादायक दावा देखील माध्यमांशी बोलताना त्यांनी केला. ज्या दिवशी मतदान होते त्यादिवशी माझ्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये जमा करण्यात आले होते. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची अंबाजोगई येथे असणाऱ्या कंपनीकडून माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यात आले होते असा दावा यावेळी निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे.

तसेच कासलेंनी पुरावा दाखवला आहे. मतदानाच्या दिवशी त्यांच्या खात्यात 10 लाख रुपये कसे जमा झाले आणि कासले यांची ईव्हीएम जवळ ड्युटी होती मात्र त्यांना तिकडून का काढले? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्रालयाला विचारा असं देखील रणजीत कासले म्हणाले.

हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या धार्मिक स्थळीच पेटला वाद…

तसेच एन्काऊंटरचा ऑफर मला व्हिडीओद्वारे कराडच्या एन्काऊंटरचा ऑफर देण्यात आला होता असा धक्कादायक दावा देखील त्यांनी केला आहे. याचबरोबर कराडच्या एन्काऊंटरची चर्चा बंद दारआड झाली होती आणि याचा पुरावा देखील माझ्याकडे आहे असा दावा देखील रणजीत कासले यांनी केला.

Exit mobile version