गर्भवती महिला मृत्यू प्रकरण; पुणे पोलिसांना आज ससूनचा अहवाल मिळणार, मंत्रिमंडळातही चर्चा होणार

गर्भवती महिला मृत्यू प्रकरण; पुणे पोलिसांना आज ससूनचा अहवाल मिळणार, मंत्रिमंडळातही चर्चा होणार

Pune Mangeshkar Hospital Case : भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी गर्भवती तनिषा सुशांत भिसे यांचा पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात यांचा मृत्यू झाला होता. (Hospital) या प्रकरणात दीनानाथ रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. यापूर्वी आलेल्या दोन्ही अहवालात रुग्णालयावर ठपकाही ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आज ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळणार आहे. तसंच, या प्रकरणात आमदार अमित गोरखे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून त्यातही तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात आलेल्या दोन अहवालांवर चर्चा होणार आहे.

फडणवीस यांची भेट

आमदार अमित गोरखे यांनी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सांगितले की, भिसे कुटुंबाला नक्की न्याय मिळेल. या प्रकरणातील ससून रुग्णालयातील शासकीय डॉक्टर असलेल्या समितीचा अहवाल येणे बाकी आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज आपण भेटणार आहोत. त्यावेळी त्यांना डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करावा, ही मागणी करणार आहोत असंही ते म्हणाले.

मंगेशकर कुटुंब लुटारूची टोळी, माणुसकीच्या नावावर कलंक, तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी वडेट्टीवार भडकले

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात कुठलाही राजकीय दबाब नाही. सर्व चौकशी पारदर्शकपणे होत आहे. विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. परंतु, न्याय मिळायला वेळ लागतो. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच तोडगा काढतील. या प्रकरणातील चौथ्या अंतिम अहवाल येणे बाकी आहे. या सर्व प्रकरणाचा निकाल भिसे कुटुंबाच्या बाजूने लागणार असल्याचं आमदार अमित गोरखे यांनी म्हटलं आहे.

आगाऊ रक्कम

ससूनच्या अहवालानंतर आज राज्य महिला आयोगाची बैठक होणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, तनिषा भिसे यांच्याबाबत जे घडले ते आता कधी घडू नये. आरोग्य सुविधा ही मुलभूत सुविधा आहे. आयएमएने आगाऊ रक्कम घेण्याबाबत जे म्हटले आहे त्याबद्दल आम्ही स्पष्टता मागू. तसंच, संपूर्ण अहवाल आल्यानंतर आपण कारवाई करू, असं त्यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube