Drunk Woman Passenger : एका मद्यधुंद महिला प्रवाशाने (woman passenger) विमानात (flight) थैमान घातल्याचा व्हिडीओ (Viral video) सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील आहे. यामध्ये एका महिला प्रवाशाने तिला विमानातून बाहेर काढताना पोलिसाचा (police) चावा घेत त्यांना लाथही मारली. या महिलेने दारू प्यायली (Drunk woman) असल्याचं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेतील साऊथवेस्ट एअरलाईन्स फ्लाईटमध्ये (flight) हा प्रकार घडला आहे. ( Viral video of Drunk woman passenger bites, kicks cop in flight )
29 मे च्या अगोदर हे विमान न्यू ऑरलेन्स येथून उड्डाण करत असताना हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. 25 वर्षीय महिला जीच नाव कमरिन गिब्सन असं आहे. तिने विमानात बसलेली असतना समोरच्या प्रवाशाला लाथ मारली होती. स्थानिक पोलिसांकडून ही माहिती मिळाली आहे.
Britain news : ब्रिटनमध्ये राहता वरून नावं ठेवता; सुनक यांनी ब्रिटनमधील स्थलांतरितांना सुनावलं
या महिलेला विमानातून खाली उतरण्यास सांगितले असता तिने नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी जबरदस्तीने या महिलेला विमानातून बाहेर काढण्याचा प्रयात्न केला. त्यावेळी या महिलेने पोलिसाचा चावा घेत त्यांना लाथही मारली. या महिलेने दारू प्यायली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
‘भारतात जिवंत लोकशाही, शंका असेल तर स्वत: जाऊन पाहा : अमेरिकेकडून मोदी सरकारचं कौतुक
या व्हायरल व्हिडीओमध्ये देखील तेच दिसत आहे. पोलिस या महिलेला विमानातून बाहेर काढत आहेत तर ही माहिला गोंधळ घालत आहे. ती म्हणत आहे की, मी फ्लाईटचे पैसे दिले आहेत. त्यानंतर तिला बाहेर काढत अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. अखेरीस, तिला दुस-या दिवशी सुधारगृहातून $6,000 दंडावर सोडण्यात आले.
खलिस्तानावाद्यांच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणतात, ‘मोहब्बत की दुकान’…; अमेरिकेत नेमकं काय झालं?
देश-परदेशात अशाप्रकारच्या विमानातील विविध घटना नेहमीच वादाचा विषय ठरत असतात. कधी सहप्रवाशांचे वाद तर कधी अशाप्रकारच्या मद्यधुंद महिला किंवा पुरूषांमुळे देखील आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायाला मिळत. ज्याचे व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात.