‘भारतात जिवंत लोकशाही, शंका असेल तर स्वत: जाऊन पाहा : अमेरिकेकडून मोदी सरकारचं कौतुक

‘भारतात जिवंत लोकशाही, शंका असेल तर स्वत: जाऊन पाहा : अमेरिकेकडून मोदी सरकारचं कौतुक

America On Indian Democracy : काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले होते की, भारतातील स्वायत्त संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं भारतातील लोकशाही सध्या ढासळत चालली आहे. तर काल अमेरिकेतील प्रवासी भारतीयांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. भाजपची विचारधारा द्वेषाची असून त्यामुळं लोकशाहीला धोका आहे, असं ते म्हणाले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लोकशाहीच्या आरोग्याबाबतची चिंता अमेरिकेने (US) फेटाळून लावली. (‘India is a vibrant democracy, go to Delhi and see for yourself’ )

अमेरिकन सरकारने सोमवारी (5 जून) सांगितले की, भारतातील लोकशाही विषयी सातत्याने बोलल्या जातं. मात्र, पीएम नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात भारतात एक जीवंत लोकशाही आहे. मोदी सरकारच्या राजवटीत लोकशाहीला काही धोका नाही, ज्यांना भारतातील लोकशाही विषयी चिंता आहे, ते कोणीही नवी दिल्लीला भेट देऊन स्वतः पाहू शकतात. व्हाईट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील राजकीय संप्रेषणाचे समन्वयक जॉन किर्बी म्हणाले की, अमेरिकन प्रशासन हे लोकशाहीबद्दल चिंता व्यक्त करण्यास कधी बोलायला कचरत नाही.

Chandrasekhar Bawankule : ‘राष्ट्रवादी हा ओबीसी विरोधी पक्ष; त्यांनी ओबीसींचा कसा घात केला हे वडेट्टीवारांना विचारा’

जॉन किर्बी म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचे स्वागत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जिल बायडेन हे करणार आहेत. त्यादरम्यान 22 जून रोजी स्टेट डिनरचेही आयोजन करण्यात येणार असल्याचं किर्बी यांनी सांगिलतं.

भारत आमचा खास मित्र आहे

अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनी जॉन किर्बी यांना डिनरचे निमंत्रण देण्यामागचे कारण विचारले. यावर ते म्हणाले की, भारत हा अमेरिकेचा अनेक पातळ्यांवर मजबूत भागीदार आहे. शांग्री-ला सचिव (संरक्षण, लॉयड) ऑस्टिन यांनी आता काही अतिरिक्त संरक्षण सहकार्याची घोषणा केली आहे. ज्याचा आम्ही भारतासोबत पाठपुरावा करणार आहोत. या देशात मोठा आर्थिक व्यापार असल्याचं त्यांनी सांगितलं.

किर्बी म्हणाले, भारत हा पॅसिफिक क्वाड सदस्य आहे आणि इंडो-पॅसिफिक सुरक्षेबाबत आमचा खास मित्र आणि भागीदार आहे. दोन्ही देशांमधील अनेक पातळ्यांवर भारत निश्चितच महत्त्वाचा आहे.

एका पत्रकाराने जॉन किर्बी यांना भारतातील लोकशाहीबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की भारत एक जीवंत लोकशाही आहे. भारताची स्थिती काय आहे हे तुम्ही तुमच्या परिचितांना विचारू शकता. लोकशाही संस्थांची ताकद आणि स्थिती या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, अशी माझी अपेक्षा आहे. अशा मुद्द्यांवर बोलायला आम्ही घाबरत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube