Britain news : ब्रिटनमध्ये राहता वरून नावं ठेवता; सुनक यांनी ब्रिटनमधील स्थलांतरितांना सुनावलं
Britain news : जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतं. हे स्थलांतरित विविध देशांमध्ये राहण्यासाठी, नोकरीसाठी जात असतात मात्र त्या देसातील मुळ नागरिक आणि स्थलांतरीत यांच्यात नेहमीच एक वादात्मक स्थिती निर्माण झालेली असते. तसेच ब्रिटनमध्ये या स्थलांतरितांमुळे स्थानिक हॉटेल्स आणि सुविधांवर ताण निर्माण होत आहे. त्यासाठी सरकारने उपाययोजना देखील आखल्या आहेत मात्र तरी काही त्रुटी राहिल्याने हे स्थलांतरित लोक ब्रिटनला नावं ठेवतात. त्यामुळे आता भारतीय वंशाचे असलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनमधील स्थलांतरितांना सुनावलं आहे. ( PM Rishi Sunak slams to Illegal Migrants in Britain )
युक्रेनचा रशियावर खेरसनमधील धरण फोडल्याचा आरोप; झेलेन्स्कींनी बोलावली आपत्कालीन बैठक
पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, मी तुम्हाला वचन देतो की, आपण स्थानिक हॉटेल्समधून बेकायदेशीर स्थलांतरितांना हटवून त्यांची दुसरीकडे सोय करू तसेच स्थानिक सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी या लोकांना थेट बोटीवर हालवण्यात येईल. येत्या १५ दिवसांत त्यातलं पहिलं जहाज पोर्टलँडमध्ये दाखल होईल. अजून दोन जहाजांची व्यवस्था करण्यात आली असून त्यावर १ हजार जणांची व्यवस्था होऊ शकेल. असं अश्वासनच पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिलं आहे.
नेमकं प्रकरणं काय?
ज्या देशांमध्ये युद्धजन्य किंवा आपत्तीजनक अशी परिस्थिती आहे त्या देशीतील लोकांसाठी ब्रिटन सरकारने एक राजाश्रय धोरण जाहिर केलं होतं. त्याअंतर्गत अशा प्रकारच्या देशांमधून येणाऱ्या स्थलांतरितांना ब्रियनमध्ये आश्रय देण्यात येत होता मात्र त्यामध्ये बेकायदेशीर नागरिकांचं ब्रियनमध्ये स्थलांतर वाढल्याचं लक्षात येत आहे.
‘भारतात जिवंत लोकशाही, शंका असेल तर स्वत: जाऊन पाहा : अमेरिकेकडून मोदी सरकारचं कौतुक
या बेकायदेशीर स्थलांतरितांमुळे स्थानिक हॉटेल्स आणि इतर सुविधांवर ताण निर्माण होत आहे. त्यासाठी सरकारने उपाययोजना देखील आखल्या आहेत मात्र तरी काही त्रुटी राहिल्याने हे स्थलांतरित लोक ब्रिटनला नावं ठेवतात. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. मात्र आता यावर स्वतछ पंतप्रधान सुनक यांनी आक्रमक भुमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान या प्रकरणानंतर ब्रिटनधील स्थलांतरितांकडून याबद्दल नाराजी व्यक्त करण्या येत आहे. याचा स्थलांतरीत नागरिकांनी निषेध केला आहे.