युक्रेनचा रशियावर खेरसनमधील धरण फोडल्याचा आरोप; झेलेन्स्कींनी बोलावली आपत्कालीन बैठक
Russia Ukraine War : युक्रेनने आज (मंगळवारी) रशियन सैनिकांवर हल्ला करुन धरण उडवल्याचा आरोप केलाय. युक्रेनने सांगितलं की, रशियन सैन्याने (Russian army)दक्षिण युक्रेनमधील एक मोठं धरण उडवलं आहे. धरण उडवल्यानंतर, युक्रेनने डनिप्रो नदीच्या (Dnipro River)आसपासच्या रहिवाशांना स्थलांतर करण्याचा सल्ला दिला आणि पुराचा इशारा दिला. (russia-ukraine-war-kakhovka-dam-destroyed)
प्रकाश आंबेडकर हे नुसती राजकारणाची दिशा भरकट आहेत; फडणवीसांची टीका
युक्रेनच्या गृह मंत्रालयाने (Ministry of Internal Affairs of Ukraine) नदीच्या उजव्या काठावरील 10 गावांतील रहिवाशांना आणि खेरसन (Kherson)शहराच्या काही भागांना आवश्यक कागदपत्रे आणि पाळीव प्राण्यांसह परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे.
पुराची शक्यता लक्षात घेऊन युक्रेनने या ठिकाणच्या रहिवाशांना लवकरात लवकर हे करण्याचा इशारा दिला आहे. खेरसन प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख अलेक्झांडर प्रोकुडिन (Alexander Prokudin)यांनी मंगळवारी सकाळी सांगितले की, रशियन सैन्याने आणखी एक दहशतवादी कृत्य केले आहे.
पाच तासांत पाणी गंभीर पातळी गाठेल, असा इशाराही त्यांनी दिला. हे धरण कोसळल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky)यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
युक्रेन आणि रशियाने एकमेकांवर धरण फोडण्यासाठी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झेलेन्स्की यांनी भाकीत केले होते की, रशिया हे धरण नष्ट करेल आणि त्यामुळे पूर येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
पुढील 24 तासांत पाणी गंभीर पातळीवर पोहोचू शकते, असा अंदाज युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रादेशिक गव्हर्नर अलेक्झांडर प्रोकुडिन यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, पाच तासांत पाणी गंभीर पातळीवर पोहोचेल. डनिप्रोच्या पश्चिम किनार्यावरील दहा गावे आणि खेरसन शहराचा काही भाग पुराचा धोका आहे आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये धरणाचा स्फोट आणि पाण्याचा वेगवान प्रवाह दिसत आहे. त्याचवेळी, काही लोक त्याला अत्यंत धोकादायक म्हणत आहेत. काही तासांतच पाण्याची पातळी एक मीटरपर्यंत वाढली. हे धरण क्रिमियन द्वीपकल्पाला पाणी पुरवठा करते, विशेषत: 2014 मध्ये मॉस्कोने ताब्यात घेतले होते, परंतु युक्रेनियन सैन्याने 2022 च्या उत्तरार्धात ते रशियाकडून परत घेतले आहे.