Download App

बुलेट ट्रेनचा रिव्हर्स गिअर! चीनमधील रेल्वे स्टेशन्स का होताहेत धडाधड बंद?

सर्वाधिक वेगाने धावणारी बुलेट ट्रेन असणाऱ्या चीनमध्ये प्रवासी नसल्याने स्टेशन बंद करण्याची वेळ आली आहे.

China Bullet Train : देशातील विकासाच्या जोरावर मोठ्या बाता मारणाऱ्या चीनचे पितळ (China Bullet Train) पुन्हा एकदा उघडे पडले आहे. सर्वाधिक वेगाने धावणारी बुलेट ट्रेन असणाऱ्या चीनमध्ये प्रवासी नसल्याने स्टेशन बंद करण्याची वेळ आली आहे. चीन सरकारने देशात अनेक ठिकाणी बुलेट ट्रेनसाठी स्टेशन सुरू केले. पण आता या स्थानकांवर प्रवाशांचा दुष्काळ पडला आहे. येथे प्रवासी आजिबात दिसत नाहीत. त्यामुळे चीन सरकारला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

चायना बिजनेस जर्नलच्या अहवालात म्हटले आहे की देशातील 26 हाय स्पीड रेल्वे स्टेशन बंद करण्यात येणार आहेत. हे सर्व स्टेशन दूरच्या अंतरावर असल्याने तसेच आसपास सुविधांचा अभाव आणि प्रवाशांची कमतरता यामुळे रिकामे पडले आहेत. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की शहरांनी हाय स्पीड रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रचंड गुंतवणूक केली. मात्र सध्याच्या परिस्थितीत रेल्वे स्टेशन एकतर बंद आहेत किंवा कधी सुरू झालेले नाहीत.

रशियाला दणका! लहानशा देशानेही वटारले डोळे; रशियन पर्यटकांना नो एन्ट्री

याचे एक उदाहरण म्हणून हैनान डॅनझो हाईटो हाय स्पीड रेल्वे स्टेशनकडे पाहता येईल. या रेल्वे स्टेशनच्या बांधकामाआठी 40 मिलियन युआन (5.61 मिलियन डॉलर) इतका मोठा खर्च आला. मात्र मागील सात वर्षांपासून या स्टेशनचा काहीच उपयोग झालेला नाही. या रेल्वे स्टेशनवर दररोज 100 प्रवासी सुद्धा नसतात हे यामागे एक मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे स्टेशन सुरू ठेवले असते तरी मोठे नुकसान सहन करावे लागले असते.

पर्यवेक्षकांचे म्हणणे आहे की हाय स्पीड रेल्वेचे निर्माण चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या धोरणांवर प्रकाश टाकते. ज्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त निर्माण होत आहे. या परियोजनांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी मोठी गुंतवणूक केली आहे. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही त्यामुळे आता या सरकारांना पैशांची टंचाई जाणवू लागली आहे. दक्षिण कॅरोलिना विद्यापीठाचे एकेन स्कूल ऑफ बिजनेसचे प्रोफेसर फ्रँक जी यांनी म्हटले आहे की असे मोठे प्रकल्प सुरू करण्याआधी व्यवस्थित विचार केला गेला नाही. असे प्रकल्प जीडीपी आणि राजकीय प्रोफाइलला प्रोत्साहन देतात. परंतु देशाच्या संपत्तीचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. आता यानंतर तरी चिनी राज्यकर्ते शहाणपणाचा धडा घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अमेरिकेचा राग तरीही भारताने ‘चाबहार’ डील केलीच; चीन-पाकिस्तानलाही धक्का!

follow us