Download App

Apple चाहत्यांची प्रतीक्षा संपली, बाजारात iPhone 16 ची धमाकेदार एंट्री

Apple iPhone 16 Launch Event : Apple चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून आज iPhone 16 चे जागतिक लॉन्च झाले आहे. Apple इव्हेंटमध्ये iPhone 16

  • Written By: Last Updated:

Apple iPhone 16 Launch Event : Apple चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून आज iPhone 16 चे जागतिक लॉन्च झाले आहे. Apple इव्हेंटमध्ये iPhone 16 भारतासह संपूर्ण जगात आज लाँच झाले आहे. iPhone 16 सह आज iPhone 16 आणि Watch Series 10 देखील कंपनीकडून लाँच करण्यात आली आहे. तसेच पहिल्यांदाच एआय फीचर्स देखील ॲपलकडून सादर करण्यात आले आहे.

iPhone 16 ग्राहकांना पाच रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना iPhone 16 अल्ट्रामॅरिन, टील, पिंक, ब्लॅक आणि ब्लू रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. iPhone 16 ला 6-कोर A18 प्रोसेसर देण्यात आले आहे. या फोनमध्ये iPhone 15 पेक्षा 30% जास्त प्रोसेसर देण्यात आले आहे.

iPhone 16 मध्ये 6.1 इंच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आले आहे तसेच iPhone 16 मध्ये कस्टमाइज ॲक्शन बटण देण्यात आले आहे. तर iPhone 16 Plus मध्ये 6.7 इंच स्क्रीन आहे. Apple iPhone 16 सिरीजमध्ये A18 बायोनिक चिपसेटसह देण्यात आले आहे. हे आयफोन 15 पेक्षा 2x फास्ट असणार आहे. हे 3nm आधारित चिपसेटसह प्रदान केले जाईल. तो iPhone 15 पेक्षा 30 टक्के वेगवान असेल. यामध्ये ॲपल इंटेलिजन्स सपोर्ट उपलब्ध असेल.

Apple Watch 10 लॉन्च

Apple इव्हेंटमध्ये Apple Watch 10 देखील लाँच करण्यात आले आहे. Watch 10 आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्प्ले असणारे वॉच आहे. तसेच या वॉचमध्ये डिस्प्ले सॉफ्ट आणि स्लीकर असणार आहे. तसेच ही वॉच पहिली वाइड अँगल OLED डिस्प्ले असणारी वॉच आहे. Apple Watch 10 जेट ब्लॅक, रोझ गोल्ड, सिल्व्हर रंगात लाँच करण्यात आली आहे. Apple Watch 10 स्लीप ट्रॅक करण्यास सक्षम असेल. याच बरोबर डबल टॅप, क्रॅश डिटेक्शन, फॉल डिटेक्शन फीचर्स देण्यात आले आहे. यूजर्सला Apple Watch 10 मध्ये 18 तासांची बॅटरी पावर मिळणार आहे.

याच बरोबर Apple AirPods 4 देखील या इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याची किंमत 179 डॉलर आहे. बाजारात Watch Series 10 आणि AirPods 4 20 सप्टेंबर 2024 पासून खरेदी करता येणार आहे. याची प्री-बुकिंग आजपासून सुरू झाली आहे.

कर्करोगावरील औषध स्वस्त होणार, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

 

follow us