कर्करोगावरील औषध स्वस्त होणार, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

  • Written By: Published:
कर्करोगावरील औषध स्वस्त होणार, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

GST Council Meeting : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज झालेल्या 54 व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत (GST Council Meeting) अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या बैठकीत कर्करोगावरील (Cancer) औषधे आणि स्नॅक्सवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बैठकीत कर्करोगावरील औषधांवरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के आणि स्नॅक्सवर 18 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तर दुसरीकडे या बैठकीत 2 हजार पेक्षा कमी व्यवहारांसाठी व्यापारी शुल्कावर 18% जीएसटी लादण्याचे प्रकरण फिटमेंट समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पेमेंट एग्रीगेटर्सना 2,000 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांवर जीएसटी भरण्यापासून सूट आहे. तसेच या बैठकीत विमा प्रीमियमवर जीएसटी लावण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आले आहे.

माहितीनुसार पुढील बैठकीत या विषयावर निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच बरोबर आरोग्य विमा पॉलिसींवरील जीएसटी दराचे तपशीलवार परीक्षण करण्यासाठी जीएसटी परिषदेने मंत्र्यांचा एक ग्रुप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियम बाबत महत्त्वपूर्ण निर्णय

तर दुसरीकडे जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीत आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियम्सवरील जीएसटी दर सध्याच्या 18 टक्क्यांवरून कमी करण्यास मोठ्या प्रमाणावर सहमती दर्शवण्यात आली आहे मात्र पुढील बैठकीत यावर निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र आणि राज्यांच्या कर अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या फिटमेंट समितीने आज झालेल्या बैठकीमध्ये कर दर तर्कसंगत करण्यासाठी अहवाल सादर केला. हे ‘आरोग्य-जीवन विम्या प्रीमियमवरील जीएसटी कपातीवरील डेटा आणि विश्लेषण देते.

NIA चा मोठा खुलासा, ‘त्या’ दिवशी बॉम्बस्फोटातील आरोपी भाजप मुख्यालयात घडवणार होते स्फोट

समोर आलेल्या माहितीनुसार, बहुतांश राज्ये विमा प्रीमियम दर कमी करण्याच्या बाजूने आहेत. जर . जीएसटीचे दर कमी झाले तर यांचा करोडो नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल याचा कारण म्हणजे प्रीमियमची रक्कम कमी होईल. जीएसटी येण्यापूर्वी विमा प्रीमियमवर सर्विस कर आकारला जात होता. 2017 मध्ये जीएसटी लागू झाला तेव्हा सर्विस कराचा समावेश जीएसटी प्रणालीमध्ये करण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube