बजेटमध्ये महिलांसाठी मोठी घोषणा; गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून होणार सुटका?

बजेटमध्ये महिलांसाठी मोठी घोषणा; गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून होणार सुटका?

Cervical Cancer : नूकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी महिलांच्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या (Cervical Cancer) लसीकरणाची घोषणा केलीयं. यंदाच्या अर्थसंकल्पात सीतारामण यांनी ही घोषणा केली असून देशातल्या 9 ते 14 वयोगटातील मुलींचा कर्करोगापासून बचाव करण्यासाठी ही लसीकरण मोहिम सुरु करण्यात येणार आहे. आता महिलांना होणाऱ्या गर्भाशय कर्करोगाची लक्षणे काय आहेत? लसीकरणामुळे हा आजार रोखता येऊ शकतो? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तर आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी 35 वेळा पॉलिसी, 26 वेळा भारत अन् 42 वेळा उच्चारलं मोदी

भारतात महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग होत असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर महिलांचं आरोग्य हित लक्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आलीयं. देशातील 9 ते 14 वयोगटातील मुलींचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आता महिलांचं गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचाव होणार असल्याचं बोललं जातंय.

गर्भाशय मुखाचा कर्करोग कशाने होतो?
महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग ह्यमुन पॅपिलोमाव्हायरसमुळे(HPV) होतो. महिलांच्या शरीरामध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात वाढल्यास महिलांना इतर आजारांना सामोरं जावं लागतं. एचपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्यास महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग होतो.
एचपीव्ही विषाणूचा संसर्ग सामान्यत: शारीरीक संबंधातून होतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरातील अनेक महिलांना लैंगिक संबंधातून HPV ची लागण होत असते. लसीकरणाद्वारे महिलांच्या शरीरातून HPV विषाणू काढून टाकला जाऊ शकतो. मात्र, काही प्रमाणात महिलांच्या शरीरामध्ये या विषाणूचा प्रसार कायम राहू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे नेमकी कोणती?
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीच्या अवस्थेत दिसून येत नाहीत. मात्र, हा आजार जसजसा वाढत जातो, तसतसं योनीतून रक्तस्त्राव होतो. त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येणे. मासिक पाळीदरम्यान अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होणे. यासोबतच शारिरीक संबंधादरम्यान ओटी आणि पोटात वेदना होणे, अशी लक्षणे आजारामध्ये आढळून येतात.

न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सचे डॉ. विज्ञान मिश्रा यांच्या मते, नियमित लसीकरण करणे हे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल आहे. लसीकरणामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा आजार टाळता येण्यासारखी परिस्थिती निर्माण होणार आहेत. लसीकरणाने या आजारावर मात करता येणार असल्याचं मत डॉ. विज्ञान मिश्रा यांनी व्यक्त केलं आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्या लसी?
आंतरराष्ट्रीय स्तरावर या कर्करोगावर मात करण्यासाठी लस उपलब्ध असून सर्व्हरिक्स ही लस महिलांना देण्यात येते. ही लस उच्च जोखीम असलेल्या महिलांना देण्यात येते. सामान्यत: दोन-डोस शेड्यूलमध्ये ही लस 9-14 वर्षे वयोगटातील मुलींना देण्यात येते.

तर दुसरी लस म्हणजे गार्डासिल. ही लस साधारणपणे 9 ते 26 वयोगटातील महिलांना देण्यात येते. वयाच्या फरकानूसार ही लस दोन किंवा तीन डोसच्या शेड्यूलमध्ये दिली जाऊ शकते. या लसीची किंमत सुमारे 3,957 रुपये इतकी आहे.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी भारतातही स्वदेशी लस बनवण्यात आली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने ही लस विकसित केली असून ही लस गार्डासिल लसीप्रमाणेच चार HPV विषाणूंवर मारा करणार आहे. सिरमने विकसित केलेल्या लसीकरणासाठी सरकारकडून प्रक्रिया सुरु असून या लसीची किंमत 200 ते 400 रुपयांपर्यंत असणार आहे.

लसीकरण कधी करावं?
सर्वसाधारणपणे महिलांनी शारीरीक संबंध ठेवण्याआधीच लसीकरण करणे गरजेचं आहे. 9 ते 14 वयोगटातील तरुण मुलींनी कर्करोगापासून बचाव करण्यासाठी लसीकरण केलं पाहिजे.

दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी लसीकरणाची घोषणा केली आहे. मात्र, देशातील महिलांची या आजारापासून सूटका होण्यासाठी त्यावर अंमलबजावणी कधी केली जाणार? लसीकरणामुळे या आजाराचं निदान होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube