तिजोऱ्या भरणारा नाही, जनतेची स्वप्नपूर्ती करणारा अर्थसंकल्प; पीएम मोदींकडून भरभरून कौतुक!

तिजोऱ्या भरणारा नाही, जनतेची स्वप्नपूर्ती करणारा अर्थसंकल्प; पीएम मोदींकडून भरभरून कौतुक!

PM Modi on Union Budget 2025 : संसदेत आज केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) सादर झाला. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं होत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मांडला. त्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अर्थसंकल्पात शक्यतो खिसे भरण्याचे काम केले जाते मात्र हा अर्थसंकल्प भारतीयांची बचत वाढवणारा आणि स्वप्नपूर्ती करणारा आहे. असं म्हणत त्यांनी अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं कौतुक केलं आहे.

कोसी प्रकल्प, आयआयटीचा विस्तार, विमानतळ; नितीशबाबूंना खूश करण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

पुढे बोलताना मोदी म्हणाले, हे सामान्य माणसाचा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताचं स्वप्न पुर्ण करणार आहे. अर्थसंकल्पात शक्यतो खिसे भरण्याचे काम केले जाते. मात्र या अर्थसंकल्पात भारतीयांची बचत वाढवली जाणार आहे. त्यामुळे यातून देशवासीयांची स्वप्नपूर्ती होणार आहे. संसदेत आज केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

Budget 2025 : निर्मला सीतारमन यांच्या बजेटमधील महत्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत…

तसेच यावेळी ते म्हणाले की, अर्थसंकल्पातील घोषणा कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये क्रांती येणार आहे. तर कर कपातीमुळे मध्यमवर्ग आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे नेणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच यंदाच्या अर्थंसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे, आरोग्य आणि टॅक्स स्लॅबसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube