Union Budget 2025 : अर्थसंकल्पानंतर काय महाग, काय स्वस्त…संपूर्ण यादीच समोर

Union Budget 2025 : अर्थसंकल्पानंतर काय महाग, काय स्वस्त…संपूर्ण यादीच समोर

Full List Of Cheaper And Costlier After Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी लोकसभेत अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर केला. सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Finance Minister Nirmala Sitaraman) म्हणाल्या की, हा देशाच्या आशा-आकांक्षांचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री म्हणाले की, आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. या अर्थसंकल्पात सरकारने सर्वांचा विकास यावर भर दिला असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सागितलंय. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काय स्वस्त, काय महाग होणार? याकडे संपूर्ण देशातील जनतेचं लक्ष लागलंय.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प 2025 सादर केला. या अर्थसंकल्पात तरुण आणि महिलांवर भर देण्यात आला. गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात विशेष भेटही देण्यात आली आहे. यावेळच्या अर्थसंकल्पात सरकारने महागाई आणि कराच्या आघाडीवर जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी अर्थसंकल्पापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.

करदात्यांना गिफ्ट! 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात टीव्ही आणि मोबाईल फोन स्वस्त होणार असल्याचे सांगितले. याशिवाय स्टिकर उपकरणं देखील स्वस्त होणार आहेत. दरवर्षी बजेटनंतर काही गोष्टी स्वस्त होतात तर काही महाग होतात. या वर्षीच्या अर्थसंकल्पानंतर जाणून घेऊया कोणत्या वस्तूंच्या किमती वाढत आहेत आणि कोणत्या वस्तू स्वस्त होत आहेत.

स्वस्त काय झालं?

टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार
मोबाईल च्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधं कस्टम ड्युटी फ्री
भारतात बनवलेले कपडे स्वस्तात विकले जाणार.
6 जीवरक्षक औषधे स्वस्त होतील.
वैद्यकीय उपकरणे स्वस्त होणार.
82 वस्तूंवरील उपकर काढला जाणार

Video : इन्कम टॅक्स ते होम लोन अन् शेती ते रेल्वे; अर्थसंकल्पाती कुणाला काय? वाचा A टू Z अपडेट

काय महाग होणार?
अर्थसंकल्पात अनेक वस्तू स्वस्त होतील, असं प्रस्तावित करण्यात आलंय. तर काही गोष्टींवर कर वाढण्याची शक्यता आहे, सरकारने अद्याप याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आणि आता KCC मर्यादा 5 लाख रुपये करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर यापूर्वी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा केवळ 3 लाख रुपये होती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube