करदात्यांना गिफ्ट! 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा

करदात्यांना गिफ्ट! 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत बजेट (Budget 2025) सादर केलं. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचं (NDA Government) हे पहिलं पूर्ण बजेट होतं. त्यामुळे देशातील जनतेबरोबरच सरकारमधील घटक पक्षांचंही बजेटकडे लक्ष होतं. या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. आयकराबाबतही मोठी घोषणा केली. 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर द्यावा लागणार नाही अशी मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली.

Budget 2025 LIVE : नवा टॅक्स स्लॅब पुढील आठवड्यात सादर होणार; सीरामन यांची घोषणा

याच अर्थसंकल्पात अर्थमंत्री सितारामण मोठी घोषणा करतील. करदात्यांना दिलासा देतील असे वाटत होते. त्यानुसार अर्थमंत्र्यांनी नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला. पुढील आठवड्यात इनकम टॅक्स बिल सादर करण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सितारामण यांनी दिली. या घोषणेनुसार आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. या व्यतिरिक्त करदात्यांना 75 हजार रुपयांच्या मानक वजावटीचा लाभ मिळणार आहे.

किती बदलला टॅक्स

0 ते 12 लाखांपर्यंत – शून्य कर
12 ते 16 लाखांपर्यंत – 15 टक्के आयकर
16 ते 20 लाखांपर्यंत – 20 टक्के आयकर
20 ते 24 लाखांपयर्यंत – 25 टक्के आयकर
24 लाखांपेक्षा जास्त 30 टक्के आयकर

सितारामण यांच्या अर्थसंकल्पातील घोषणा

वयोवृद्ध लोकांना टॅक्स सवलत देण्यात आली आहे. चार वर्षांपर्यंत अपडेडेट रिटर्न भरता येईल.

कॅन्सरसाठीच्या 36 औषधांवर पूरण कर सवलत राहील. यांसह अन्य औषधांवरील कस्टम ड्युटी हटवणार.

बजेटमध्ये डीपटेक फंडाची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत पुढील पाच वर्षात केंद्र सरकार आयआयटी आणि आयआयएसमध्ये टेक रिसर्चसाठी 10 हजार फेलोशिप देणार.

स्टार्टअपसाठी कर्जमर्यादा 20 कोटी करण्यात येणार. गॅरंटी शुल्कातही कपात करणार

एमएसएमईचे लोन गॅरंटी कव्हर पाच कोटींवरून 10 कोटी करण्यात येणार.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube