Budget 2025 LIVE : मोदी सरकराचं नोकरदारांना मोठं गिफ्ट; 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

  • Written By: Published:
Budget 2025 LIVE : मोदी सरकराचं नोकरदारांना मोठं गिफ्ट; 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

Budget 2025 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर करणार असून, सलग 8 व्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम सीतारामन करणार आहेत. सीतारामन 2019 मध्ये भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनल्या. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केले. तेव्हापासून सीतारामन यांनी सात अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केले आहेत. 26 नोव्हेंबर 1947 रोजी देशाचे पहिले अर्थमंत्री आरके षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला सामान्य अर्थसंकल्प सादर केला होता. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि नंतर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री म्हणून एकूण 10 अर्थसंकल्प सादर केले आहेत. आजच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याबरोबरच 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बजेटचे क्षणाक्षणाचे अपडेट देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग….

LIVE NEWS & UPDATES

  • 01 Feb 2025 12:15 PM (IST)

    12 लाख उत्पन्नापर्यंत कोणताही कर नाही

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. 

    • 0-4 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नाही
    •  4-8 लाखांपर्यंत 5 टक्के टॅक्स
    •  8-12 लाखांपर्यंत 10 टक्के टॅक्स
    • 12-16 लाखांपर्यंत 15 टक्के टॅक्स
    •  16-20 लाखांपर्यंत 20 टक्के टॅक्स

  • 01 Feb 2025 12:11 PM (IST)

    अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा

    ज्येष्ठ नागरिकांसाठी कर कपातीची मोठी घोषणा करण्यात आली आहे; त्यांना चार वर्षांसाठी रिटर्न भरता येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट करण्यात आली आहे. तसेच आयटीआर आणि टीडीएस मर्यादा वाढवण्यात आली असून, टीडीएस मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • 01 Feb 2025 12:08 PM (IST)

    कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी संबंधित 36 औषधे पूर्णपणे शुल्कमुक्त

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, 36 जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द केला जाईल. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर बांधले जातील. कर्करोगावरील उपचारांसाठी औषधे स्वस्त होतील. 6 जीवरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी कमी करून 5 टक्के करण्यात येणार आहे.

  • 01 Feb 2025 12:04 PM (IST)

    काय स्वस्त होईल?

    जीवरक्षक औषधे स्वस्त होतील. कॅन्सरची औषधे स्वस्त होतील. एलईडी-एलसीडी टीव्हीच्या किमती कमी होतील. यांवर लावण्यात येणारे कस्टम ड्युटी कमी करण्यात आली. लिथियम आयन बॅटरी स्वस्त होतील. ईव्ही आणि मोबाईलच्या बॅटरी स्वस्त होतील. 

  • 01 Feb 2025 11:53 AM (IST)

    सरकारी शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब

    तरुणांच्या मनात कुतूहल, नवकल्पना आणि वैज्ञानिक विचारांना चालना देण्यासाठी येत्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये ५०,००० अटल टिंकरिंग लॅबची स्थापना करण्यात येणार आहे. 

  • 01 Feb 2025 11:51 AM (IST)

    नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात सादर होणार

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन आयकर विधेयकाबाबत मोठी घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. सरकार पुढील आठवड्यात आयकराचे नवीन विधेयक आणणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी करदात्यांना अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. असे मानले जात होते की जुन्या आणि नवीन दोन्ही आयकर प्रणालींमध्ये करदात्यांना अनेक सूट आणि कपात दिली जाऊ शकते. मात्र ही प्रतीक्षा आठवडाभराने वाढली आहे.

  • 01 Feb 2025 11:45 AM (IST)

    गरिबांच्या घरांचं स्वप्न पूर्ण होणार

    गरिबांसाठी मोठी घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ लाख अपूर्ण घरे पूर्ण केली जाणार आहेत.यामुळे घराचं स्वप्न बघणाऱ्या गरिबांना हक्काचं घर मिळणार आहे.

  • 01 Feb 2025 11:37 AM (IST)

    मेडिकल विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा काय?

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 10 हजार जागा वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आयआयटीमध्ये ६५०० जागा वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 3 AI केंद्रे उघडली जातील. याशिवाय 5 वर्षात मेडिकलमध्ये 7500 जागा वाढवण्यात येणार आहेत. एआय शिक्षणासाठी 500 कोटी रुपयांचे बजेट.

  • 01 Feb 2025 11:33 AM (IST)

    ६ प्रमुख क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या जाणार : अर्थमंत्री

    अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सहा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या सुधारणा केल्या जातील. यात

    १. कर आकारणी (Taxation)

    २. शहरी विकास (Urban Development)

    ३. खाण क्षेत्र (Mining)

    ४. आर्थिक क्षेत्र (Financial Sector)

    ५. वीज आणि ऊर्जा क्षेत्र (Power Sector)

    ६. नियामक सुधारणा (Regulatory Reforms)

  • 01 Feb 2025 11:30 AM (IST)

    एमएसएमई क्षेत्रात क्रेडिट कव्हर वाढवले ​​जाणार

    एमएसएमई क्षेत्र
    सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्या एक कोटी आहे आणि त्यांच्याशी ५.७ कोटी लोक जोडलेले आहेत. हे भारताला जगात उत्पादन केंद्र बनविण्यासाठी उपयुक्त आहे. या एमएसएमईजचा निर्यातीत ४५ टक्के वाटा आहे. एमएसएमईंसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर वाढवले ​​जाणार असून एमएसएमई वर्गीकरणासाठी गुंतवणूक मर्यादा २.५ पट वाढवली जाईल. वर्गीकरणासाठी उलाढाल मर्यादा दुप्पट केली जाणार.

    कस्टमाइज्ड क्रेडिट
    सूक्ष्म उद्योगांसाठी ५ लाख रुपयांच्या मर्यादेसह कस्टमाइज्ड क्रेडिट्स जारी केले जातील. पहिल्या वर्षी अशी १० लाख कार्डे दिली जातील.

    मुदत कर्ज
    पहिल्यांदाच उद्योजकांना २ कोटी रुपयांचे मुदत कर्ज दिले जाईल. पाच लाख महिला आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोक त्याच्या कक्षेत येतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube