Budget 2025 LIVE : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर केला असून, यात मोदी सरकारने नोकरदारवर्गाला मोठा दिलासा देत 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच 4 वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र दाखल करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. […]